मुंबई – राज्यातील करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता अखेर इयत्ता १०वीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तशी माहिती आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी दिली आहे. मात्र, इयत्ता १२वीची परीक्षा होणार असल्याचे डॉ. टोपे यांनी स्पष्ट केले आहे.
कोरोना प्रादुर्भावामुळे राज्यात सध्या कलम १४४ लागू करण्यात आले आहे. त्यातच इयत्ता १०वी व १२वीची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता १०वीची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. यापूर्वीच सीबीएसई आणि आयसीएसई या बोर्डांनी त्यांच्या इयत्ता १०वीची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर आता राज्य बोर्डाची इयत्ता १०वीची परीक्षा रद्द झाली आहे. इयत्ता १२वीची परीक्षा मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे.
https://twitter.com/VarshaEGaikwad/status/1384488873598746624