दहावी २०२२ परीक्षेचं स्वागत का आणि कसं करावं?
विद्यार्थी मित्रांनो, दहावीची वार्षिक परीक्षा 15 एप्रिल पासून सुरू होणार आहे. सर्व विद्यार्थांच्या आयुष्याला कलाटणी देणारी ही सुवर्ण संधी आहे. विद्यार्थांनी या परीक्षेचं स्वागत का करावं आणि कसं करावं याचे मार्गदर्शन या व्हिडिओत विजय गोळेसर यांनी केले आहे. विद्यार्थी मित्रांनो, अजूनही 20 दिवस आपल्या हातात आहेत. या २० दिवसांत दहावीच्या विद्यार्थांनी परीक्षेची तयारी कशी करावी. आपला आत्मविश्वास कसा वाढवावा आणि टिकवून ठेवावा. अभ्यास करतांना लक्षांत ठेवण्यासाठी मनाची मदत कशी घ्यावी तसेच पेपर कसे लिहावेत. परीक्षेच्या कालावधीत कसं रहावं आणि दहावीच्या वार्षिक परीक्षेत जास्तीत जास्त गुण मिळविण्यासाठी काय करावं याचे मार्गदर्शन ‘वेलकम दहावी’ या मालिकेत देण्यात येईल. बघा हा व्हिडिओ