इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – असे म्हणतात की, रावणाची लंका ही सोन्याची होती, इतकेच नव्हे तर ‘लंकेत सोन्याचे विटा ‘अशी म्हण देखील एकेकाळी प्रचलित होती. म्हणजे थोडक्यात श्रीलंकेत आर्थिक सुबत्ता होती, परंतु सध्याच्या काळात श्रीलंका हा देश अत्यंत कर्जबाजारी झाला असून एक प्रकारे कंगालच झाला आहे. या ठिकाणी केवळ अन्नधान्याची नव्हे तर इंधन आणि विजेची देखील त्यांच्या निर्माण झाली नाही. त्याचप्रमाणे स्कूलबस सारख्या वाहनांसाठी इंधन नसल्याने आठवडाभरासाठी चक्क शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.
श्रीलंका आज देशोधडीला लागलेली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून श्रीलंका कोलमडून पडली आहे. कोरोनानंतर देश उभरत असतानाच या देशात इंधनाचा तुटवडा झाला. त्यानंतर प्रचंड महागाई वाढली असून वीजेचे उत्पादन घटले आहे. श्रीलंकेतील वाढत्या आर्थिक संकटानंतर, परिस्थिती खूप बिघडली आहे, श्रीलंकेच्या पंतप्रधानांनाही राजीनामा द्यावा लागला. श्रीलंकेच्या संकटामागे अनेक कारणे आहेत, ज्यामुळे आज देशातील परिस्थिती अनियंत्रित झाली आहे.
श्रीलंकेतील वाढत्या आर्थिक संकटानंतर परिस्थिती सातत्याने अनियंत्रित होत आहे. आर्थिक संकटात वाढ झाल्यानंतर देशातील राजकीय संकटही गडद झाले आहे. आधी मंत्रिमंडळाने राजीनामा दिला, त्यानंतर पंतप्रधान राहे यांनी राजीनामा दिला. पंतप्रधानांच्या राजीनाम्यानंतर देशातील परिस्थिती अनियंत्रित, जनता रस्त्यावर उतरली आहे. आता लष्कराला कमांड ताब्यात घ्यावी लागली असून त्यांनी आंदोलकांवर गोळ्या झाडण्याचे आदेश जारी केले आहेत.
श्रीलंकेत हे संकट कसे निर्माण झाले आहे आणि यासाठी सरकारची कोणती धोरणे जबाबदार आहेत. श्रीलंकेला 1948 मध्ये ब्रिटनपासून स्वातंत्र्य मिळाले आणि स्वातंत्र्याच्या 74 वर्षानंतर हे सर्वात मोठे आर्थिक संकट मानले जाते. आता येथे महागाईही गगनाला भिडत आहे. यामागची कारणे सांगितली तर पहिले कारण म्हणजे श्रीलंकेवरील चीनसारख्या देशांचे बाह्य कर्ज होय. समीक्षकांचे असे मत आहे की, अत्यावश्यक नसलेल्या पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळे कर्जात लक्षणीय वाढ झाली आहे. श्रीलंकेवर सध्या ५१ अब्ज डॉलरचे विदेशी कर्ज असल्याचे सांगितले जात आहे.
यासोबतच परकीय चलनाचा साठाही सातत्याने कमी होत आहे. श्रीलंकेच्या कर्जाच्या पेमेंटमध्ये या वर्षी अंदाजे 8.6 अब्ज डॉलर्सची घट झाली आहे. तसेच श्रीलंकेतील या परिस्थितीमागे कोरोना विषाणूच्या साथीलाही जबाबदार धरले जात आहे. वास्तविक, कोरोना महामारीच्या काळात ट्रॅव्हल इंडस्ट्रीला मोठा फटका बसला होता आणि श्रीलंकेच्या अर्थव्यवस्थेत कोरोना महामारीचा मोठा वाटा आहे. गेल्या वर्षभरात या क्षेत्राला मोठा फटका बसला असून त्यामुळे परकीय चलनातही लक्षणीय घट झाली आहे.
अनेक टीकाकार सरकारच्या या निर्णयाला अत्यंत चुकीचे मानतात आणि आजच्या परिस्थितीसाठी या निर्णयाला जबाबदार धरतात. याशिवाय देशातील अनेक वस्तूंच्या आयातीवर सरकारने बंदी घातली. त्यात रासायनिक अन्नाचाही समावेश आहे, ज्याचा पिकांवर मोठा परिणाम झाला. परिणामी खाद्यपदार्थही बाहेरून मागवावे लागले. त्यामुळे महागाई खूप वाढली आणि समस्या बिकट झाली.
भारत आणि इतर मित्र देशांनी केलेल्या मदतीवर श्रीलंकेची गुजराण सुरु आहे. सध्या इंधन नसल्याने आणि ते खरेदी करण्यासाठी पत नसल्याने श्रीलंकेने एक आठवडा देशातील शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. रुग्णालय आणि अन्य आपातकालीन समस्यांचा सामना कराण्यासाठी राखीव इंधनाचा वापर करण्यात येणार आहे. पण तोपर्यंत या देशातील शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत.
श्रीलंकेच्या ऊर्जामंत्र्यांनी जाहीर केल्यानुसार, त्यांच्या देशाकडे काही दिवस पुरेल एवढाच तेल साठा शिल्लक आहे. आपतकालीन स्थिती आणि रुग्णालयांसाठी हा साठा राखीव ठेवण्यात आला आहे. अन्य देशात स्थायीक श्रीलंकन नागरिकांनी देशाला सढळ हातांनी मदत करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. त्या निधीतून देशाला इंधन खरेदी करता येणार आहे. श्रीलंका विदेशी कर्जाच्या ओझ्याखाली दबला आहे आणि त्याला हप्ते फेडणे अशक्य झाले आहे. श्रीलंकेची बिकट परिस्थिती पाहता कोणतीही तेल पुरवठादार कंपनी श्रीलंकेला क्रेडिटवर इंधन पुरवठा करण्यास सध्यातरी तयार नाही.
Srilanka Economic Crisis School Closed for Week Reason