इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – श्रीलंकेत आंदोलकांचा उद्रेक झाला असून त्यांनी राष्ट्रपती भवन ताब्यात घेतले. त्याचबरोबर आंदोलक आता आणखी आक्रमक झाले आहेत. आंदोलकांनी बनावट मंत्रिमंडळाची बैठकही घेतली. या बैठकीत त्यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसोबत देशाच्या आर्थिक संकटावरही चर्चा केली. याशिवाय, मॉक कॅबिनेट बैठकीत आंदोलकांनी पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांच्या घरावर झालेल्या जाळपोळीवरही चर्चा केली.
आंदोलकांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी सोबत केलेल्या मॉक मीटिंगमध्ये एका परदेशी तरुणाचाही समावेश होता. तसेच आंदोलकांना पकडल्यानंतर हा परदेशी तरुण राष्ट्रपती भवनाला भेट देण्यासाठी गेला होता. आंदोलकांनी राष्ट्रपती भवनावर ताबा घेतल्यानंतर तेथील बेडरूम, स्विमिंग पूल, जिममध्ये फिरताना आणि मजा करताना दिसले. शनिवारी निदर्शक हिंसक झाल्यानंतर राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी त्यांच्या अधिकृत निवासस्थानातून पळ काढला. मात्र ते कुठे गेले याची माहिती नाही.
अभूतपूर्व आर्थिक संकटामुळे लोकांच्या संतापामुळे ७३ वर्षीय गोटाबाया राजपक्षे आपल्या कुटुंबासह भूमिगत झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. श्रीलंकेत राजकीय संकट असताना सर्वपक्षीय सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. यावर एकमत घडवण्यासाठी प्रमुख विरोधी पक्षांची बैठक आयोजित करण्यात आली असून, त्यात एकमत झाले आहे.
विशेष म्हणजे दि. 13 जुलै रोजी राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे राजीनामा देणार असल्याचे सांगण्यात येत आहे. राष्ट्रपतींच्या राजीनाम्यानंतर सर्वपक्षीय सरकार स्थापन होऊ शकते. सर्वपक्षीय सरकार स्थापन करण्यासाठी सर्व पक्षांच्या नेत्यांनी सहमती दर्शवली आहे. राष्ट्रपतींनी राजीनामा देताच यावर कायदेशीर प्रक्रिया सुरू होईल. दुसरीकडे, पंतप्रधान विक्रमसिंघे यांनीही राजीनामा देण्याची ऑफर दिली, परंतु विरोधकांनी राजीनामा देण्याची ऑफर देऊनही पंतप्रधान विक्रमसिंघे यांना सोडले नाही आणि राजधानीतील एका संपन्न भागात त्यांचे खाजगी निवासस्थान पेटवून दिले.
याआधी मे महिन्यात राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांचे मोठे बंधू आणि तत्कालीन पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांना सरकारविरोधी मोठ्या निदर्शनांमुळे पायउतार व्हावे लागले होते. महिंदा आणि गोटाबाया या दोन्ही भावांना श्रीलंकेतील बर्याच नागरिकांनी LTTE विरुद्ध गृहयुद्ध जिंकल्याबद्दल नायक म्हणून गौरवले होते, परंतु आता त्यांनी दोन्ही भावांना देशाच्या सर्वात वाईट आर्थिक संकटासाठी जबाबदार धरले आहे.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसंदर्भातील मॉक मिटिंगमध्ये आंदोलकांनी एका परदेशी तरुणालाही सहभागी केले होते. हा परदेशी तरूण आंदोलकांनी राष्ट्रपतीभवनावर कब्जा केल्यानंतर तेथे फिरण्यासाठी गेला होता. याशिवाय, राष्ट्रपती भवनातील गोटबाया यांच्या बेडरूममध्ये, स्विमिंग पूलमध्ये आणि जिममध्ये आंदोलक मस्ती करतानाचे व्हिडिओदेखील सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहेत.
श्रीलंकेतील अभूतपूर्व आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर संतप्त झालेल्या नागरिकांमुळे 73 वर्षीय गोटाबाया राजपक्षे, आपल्या कुटुंबासह भूमिगत झाल्याची शंका व्यक्त केली जात आहे. 22 दशलक्ष लोकसंख्या असलेला हा देश सात दशकांतील सर्वात वाईट काळ अनुभवत आहे. श्रीलंकेकडे परकीय चलनाची कमतरता असल्याने, तेथे इंधन आणि इतर आवश्यक वस्तूंचाही तुटवडा जाणवू लागला आहे. अशा परिस्थितीत जनता रस्त्यावर उतरली असून देशात अराजकता निर्माण झाली आहे.
Srilanka Economic Crisis Mock Cabinet Meet IMF Civil War