इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आर्थिक संकटात सापडलेल्या श्रीलंकेसाठी ९ तारखेचा दिवस अशुभ ठरला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून सलग ९व्या दिवशी या देशात अनेक बड्या नेत्यांनी राजीनामे दिले आहेत. सर्वप्रथम ९ मे रोजी श्रीलंकेचे तत्कालीन पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. यानंतर ९ जून रोजी बेसिल राजपक्षे यांनी राजीनामा दिला. बेसिल हे श्रीलंकेचे अर्थमंत्री होते. त्याच वेळी, काल ९ जुलै रोजी पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांच्यासह अनेकांनी राजीनामे दिले आहेत.
श्रीलंकेतील संकट वाढल्यानंतर पहिला मोठा राजकीय बदल ९ मे रोजी झाला. या दिवशी तत्कालीन पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. महिना उलटून गेल्यानंतर अर्थमंत्री बासिल राजपक्षे यांनाही आपले पद गमवावे लागले. यानंतर ९ जुलै रोजी सर्व सीमा तोडण्यात आल्या. ९ जुलै रोजी श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे हे नागरिकांचा उद्रेक पाहून फरार झाले. तर, संध्याकाळी श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी राजीनामा दिला.
श्रीलंकेतील संकट अजूनही संपलेले नाही. आजपासून सुरू झालेली राजीनाम्याची प्रक्रिया थांबलेली नाही. पंतप्रधान विक्रमसिंघे यांच्यानंतर श्रीलंकेच्या कॅबिनेट मंत्र्यांनी राजीनामे देण्यास सुरुवात केली. मंत्री बंडुला गुणवर्धन यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर, राष्ट्रपतींचे माध्यम प्रमुख (प्रेसिडेंशियल मीडियाचे महासंचालक) सुदेव हेत्तियाराची यांनीही राजीनामा दिला. विशेष म्हणजे देशातील जनता निदर्शने करत राष्ट्रपतींच्या निवासस्थानी पोहोचली. यानंतर त्यांनी राष्ट्रपतींच्या जलतरण तलावापासून विविध ठिकाणांवर कब्जा मिळवला. यानंतर रात्री उशिरा पंतप्रधान विक्रम रणिलसिंघे यांच्या खासगी निवासस्थानालाही आग लावण्यात आली.
Srilanka 9 date is not lucky see the various incidences Srilanka Economic Crisis