बुधवार, डिसेंबर 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

गुरुपौर्णिमा : आदरांजलीचा अनोखा दिवस

जुलै 13, 2022 | 10:55 am
in इतर
0
IMG 20220705 WA0174 e1657689776441

 

विवेक अत्रे
भारताच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेमध्ये असे अनेक अद्वितीय पैलू आहेत, जे इतर बऱ्याच संस्कृतींसाठी पूर्णपणे अनोळखी आहेत आणि ज्यातून आपल्या परंपरेचा पाया किती सखोल विचारांवर प्रस्थापित आहे ते स्पष्टपणे दिसून येते. आपल्या पारंपरिक मूल्यांचा महत्त्वपूर्ण भाग असणारा आपल्या जीवनाचा एक पैलू म्हणजे गुरु शिष्य संबंध. भारतीय समाजाने अनादी काळापासून गुरूला सर्वोच्च स्थान दिले आहे, कारण गुरूची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही. संत कबीरांनी म्हटल्याप्रमाणे, कहैं कबीर बल बल सतगुरु की । धन्न शिष्य का लहना ।। म्हणजे गुरूची महती शब्दांच्या पलीकडची असते आणि शिष्याचे भाग्य मोठे असते…”

श्री श्री परमहंस योगानंद यांच्या शिष्या आणि योगदा सत्संग सोसायटी ऑफ इंडिया (वायएसएस)/ सेल्फ-रिअलाइझेशन फेलोशिप (एसआरएफ) च्या माजी अध्यक्षा श्री मृणालिनी माता, यांनी त्यांच्या ” गुरु-शिष्य संबंध (गुरु-डिसायपल रिलेशनशिप)” या पुस्तकात, ‘गुरु जसे शिष्याचे जीवन बदलू शकतात, तसे अन्य कोणतीही शक्ती करू शकत नाही’, हे प्रभावीपणे समोर आणले. शिष्याला हुबेहूब आपल्यासारखे घडवण्याची क्षमता आणि अंगभूत शक्ती गुरूकडे असते.

आजच्या जगात, एखादा लोकप्रिय शिक्षक सहज सापडू शकतो, परंतु योगानंदजींनी साधकांना गुरु निवडताना काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे, “जेव्हा तुम्ही जीवनाच्या खाईत आंधळ्यासारखे चाचपडत असता, अंधारात अडखळत असता, तेव्हा तुम्हाला डोळस व्यक्तीची मदत आवश्यक असते… एखादा मार्ग खरा आहे की नाही हे समजण्यासाठी, त्यामागे कोणत्या प्रकारचे गुरू आहेत, त्याच्या कृतींवरून ते ईश्वराने दाखवलेल्या मार्गावर चालत आहेत की स्वतःच्या अहंकारानुसार वागत आहेत; या गोष्टी तपासून पहा. त्याच्यामागे कितीही अनुयायी असले, तरी ज्याला आत्मानुभव नाही, तो मार्गदर्शक तुम्हाला ईश्वराचे साम्राज्य दाखवू शकत नाही.

हिमालयात शतकानुशतके वास्तव्य केलेले महान ‘मृत्युंजय’ गुरू महावतार बाबाजी यांनी १८६१ मध्ये आपल्या महान शिष्य लाहिरी महाशयांना क्रियायोगाच्या लुप्त पावलेल्या कलेची दीक्षा दिली होती. त्यानंतर लाहिरी महाशयांचे शिष्य स्वामी श्री युक्तेश्वर गिरी यांनी योगानंदजींना प्रशिक्षित करण्याची आणि त्यांच्या पुढील कार्यासाठी त्यांना तयार करण्यासाठी धुरा स्वतःच्या खांद्यावर घेतली. योगानंदजींनी स्थापन केलेल्या योगदा सत्संग सोसायटी/सेल्फ रिअलाइझेशन फेलोशिप या संस्थांद्वारे लाखो लोकांना या मुक्तीदायी वैज्ञानिक प्रविधीची दीक्षा देण्यात आली आणि आज सुमारे 175 देशांमध्ये त्याच्या पाउलखुणा दिसत आहेत. योगदा सत्संग सोसायटी/सेल्फ रिअलाइझेशन फेलोशिप यांच्या अथक प्रयत्नांमुळे क्रियायोगाचा आशीर्वाद आजही अधिक भरभराटीस येतो आहे.

योगानंदजींच्या जागतिक स्तरावर प्रशंसा प्राप्त झालेल्या, जीवनाला कलाटणी देणाऱ्या, “योगी कथामृत” [ऑटोबायोग्राफी ऑफ अ योगी] या अभिजात आध्यात्मिक पुस्तकात, गुरू शिष्य नातेसंबंध अतिशय प्रेमाने आणि सविस्तरपणे वर्णन केले आहेत. श्री युक्तेश्वरजींचे काळजीपूर्वक मार्गदर्शन आणि काटेकोर प्रशिक्षण यांच्यामुळे योगानंदजी ईश्वर आणि त्यांचे गुरू यांच्याशी आध्यात्मिक समरसतेचे खरे उदाहरण बनले. त्यांच्या योग-ध्यान आणि संतुलित जीवन जगण्याच्या कालातीत सार्वभौमिक शिकवणींद्वारे योगानंदजी त्यांच्या आयुष्यात हजारो लोकांचे आणि नंतरच्या काळात लक्षावधी लोकांचे आध्यात्मिक मित्र, मार्गदर्शक आणि तत्वज्ञानी बनले.

‘जगत गुरू’ म्हणून ओळखले गेलेले योगानंदजी यांचा मुख्य भर महर्षी पतंजलींनी सांगितलेल्या अष्टांगयोगाच्या मार्गाचे अनुसरण करून नियमित आध्यात्मिक साधनेद्वारे आंतरिक लढाई जिंकण्यावर आहे. खरे पाहता प्रत्येक व्यक्ती म्हणजे एक आत्मा आहे आणि परमात्म्याशी स्वतःचे एकत्व पुन्हा शोधण्याची आंतरिक तळमळ प्रत्येकाला आहे, हे सत्य योगानंदजींनी लोकांच्या मनावर बिंबवले. सर्व सत्यशोधकांच्या सखोल आकलनासाठी त्यांनी, “भगवद्गीता” आणि “बायबल” या महान धर्मग्रंथांवर भाष्ये लिहिली. त्यांची शिकवण सर्वांपर्यंत पोहोचवण्यात त्यांची इतर प्रकाशने आणि विशेषतः त्यांचे “जीवन कसे जगावे – गृह-अभ्यासाची पाठमाला” यांचा बहुमोल वाटा आहे.

गुरुपौर्णिमा ही भारतातील महान गुरूंना आदरांजली वाहण्याची सर्वात मधुर प्रथा आहे. या महत्त्वपूर्ण दिवशी गुरूंच्या आदर्शांना पुनःसमर्पण करून, निष्ठावान शिष्य आत्म-साक्षात्काराच्या शिडीवर पुढची पायरी चढतो. अधिक माहितीसाठी: yssi.org

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

बाबो! तब्बल ९४ वर्षे वयाच्या आजीबाईंनी जिंकले सुवर्णपदक; देशाचे नाव केले उज्ज्वल

Next Post

शिवसेनेने ग्रामीण भागात बदलले पदाधिकारी; जुन्या, नव्या कार्यकर्त्यांना दिली संधी

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, १४ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 13, 2025
Vishwadharmi Manavta Teertha Rameshwar Rui
महत्त्वाच्या बातम्या

उध्वस्त मंदिर व मशिदीच्या जागी ‘विश्वधर्मी मानवतातीर्थ भवन’… उद्या होणार लोकार्पण… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
traffic signal1
महत्त्वाच्या बातम्या

अहिल्यानगर – मनमाड मार्गावरील वाहतुकीबाबत झाला हा महत्वाचा निर्णय…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0024
मुख्य बातमी

कुंभमेळ्यासाठी साडेपाच हजार कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमीपूजन…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0023
महत्त्वाच्या बातम्या

पंचवटीतील रामकाल पथचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमीपूजन… रामकुंडाचा चेहरामोहरा बदलणार…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0021
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण… अशी आहेत तिची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, १३ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 12, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

या शहरात तीव्र थंडीची लाट… असा आहे हवामानाचा अंदाज…

नोव्हेंबर 12, 2025
Next Post
Shivsena1

शिवसेनेने ग्रामीण भागात बदलले पदाधिकारी; जुन्या, नव्या कार्यकर्त्यांना दिली संधी

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011