इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष अनुरा कुमार दिसानायका यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना “श्रीलंका मित्र विभूषण” पुरस्कार प्रदान केला. हा पुरस्कार श्रीलंकेचा परदेशी नेत्यांना दिला जाणारा सर्वोच्च सन्मान आहे. हा पुरस्कार प्राप्त करणारे मोदी हे पहिले भारतीय नेते आहेत. भारत आणि श्रीलंका यांच्यातील मैत्री दृढ करण्यामध्ये त्यांच्या दीर्घकालीन योगदानाबद्दल त्यांना हा सन्मान देण्यात आला.
पंतप्रधानांनी हा सन्मान भारतातील 1.4 अब्ज लोकांच्या वतीने स्वीकारत , भारत आणि श्रीलंका यांच्यातील विशेष मैत्री तसेच दोन्ही देशांच्या नागरिकांमधील प्राचीन संबंधांना हा सन्मान अर्पण केला.