मॉस्को – रशियाच्या स्पुटनिक या लसीने संपूर्ण जगाला मोठी गुडन्यूज दिली आहे. स्पुटनिक ५ या लसीनंतर आता स्पुटनिक लाईट ही लस आली आहे. या लसीचा केवळ एकच डोस पुरेसा आहे. विशेष म्हणजे, हा एकच डोस कोरोनावर प्रतिबंधक असल्याचा दावा करण्यात आला आहे. सद्यस्थितीत सर्व लस या दोन डोस घ्याव्या लागणाऱ्याच आहेत. त्यामुळे केवळ एक डोस असलेली डोस प्रथमच समोर आली आहे. या लसीमुळे कोरोनाच्या संकटात आशेचा मोठा किरण निर्माण झाला आहे. तसेच, या जगभरात लसीकरणाला मोठा वेग येणार असल्याचे स्पष्ट होत आहे. रशियाच्या गमेलिया इन्स्टिट्यूटने ही लस विकसित केली आहे. स्पुटनिक लाईट या लसीला रशियात मान्यता देण्यात आली आहे. भारतात स्पुटनिक ५ या लसीला मान्यता आहे. त्यामुळे भारतात स्पुटनिक लाईट या लसीचा अर्ज केव्हा केला जातो आणि त्यास मान्यता केव्हा मिळते, याची उत्सुकता आहे. कारण, ही लस आल्यानंतर भारतासारख्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशात लसीकरणाला मोठा वेग येणार आहे.
https://twitter.com/sputnikvaccine/status/1390274722487746563