खा.गोडसे यांच्या पुढाकाराने मोहिमेला प्रारंभ
नाशिक – शहरातील वाढती रुग्णसख्या आटोक्यात आणण्यासाठी निबंध लागू करण्यात आले आहे. वाढत्या लोकसंख्येची खासदार हेमत गोडसे यानी गभीर दखल घेत उपाययोजनाचा एक भाग म्हणून शहरात ड्रोनद्वारे हायपोक्लोराईड सॅनिटायझरची फवारणी करण्याचा निर्णय घेतला आहे . हायपोक्लोराईड सॅनिटायझर किती प्रभावी आहे याची चाचपणी करण्यासाठी आज खा गोडसे यांनी ड्रोनद्वारे हायपोक्लोराईड सॅनिटायझर फवारणीला प्रायोगिक तत्वावर रविवार कारजा येथून प्रारंभ केला .
शहरातील मुख्य रहदारीचा आणि मध्यवर्ती बाजारपेठेचा चौक असलेल्या रविवार कारंजा परिसरात आज सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास खासदार गोडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत ड्रोनद्वारे फवारणीला सुरुवात करण्यात आली . यावेळी माजी महापौर विनायक पांडे , नाना काळे , सचिन बांडे , राजेंद्र नानकर , संजय चिचोरे , पप्पू टिळे , वैभव खैरे , सतोष ठाकुर , विजय काकड , शाम कांगले , राजेंद्र शिरसागर , राजू राठोड , मयुर जुन्नरे , प्रदीप कोठुळे , शुभम करमासे , बिटू बनकर आदी उपस्थित होते . सदर फवारणीची मोहिम गरूडा अॅरोस्पेस या कंपनीचे पायलट बानुप्रकाश के.बी. , श्रेषराज ए . यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली प्रायोगिक फवारणी मोहिम सुमारे अर्ध्या तासाची होती . या ड्रोनमध्ये एकाचवेळी सुमारे बारा लिटर सोडियम हायपोक्लोराईड इतक्या सॉनेटायझर औषधाची क्षमता आहे . खासदार गोडसे यांच्या या अभिनव उपक्रमाची शहरवासियाकडून कौतुक होत आहे .