पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात येणार आहे. सावित्रीबाईंच्या येणाऱ्या जयंतीदिनी (३ जानेवारी) या पुतळ्याचे अनावरण होईल, अशा पद्धतीने सर्व काम पूर्ण करण्यात येणार आहे. आज अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पूर्णाकृती पुतळ्याच्या जागेचे भूमिपूजन केले.
यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.नितीन करमळकर, जेष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके,आमदार सिद्धार्थ कुशवाह,पंकज भुजबळ,कमलताई ढोले पाटील,बापूसाहेब भुजबळ,कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार, प्राचार्य संजय चाकणे, प्राचार्य सुधाकर जाधवर, प्रा. विजय सोनवणे,अभिमन्यू माळी,मंजिरी धाडगे, विभागीय अध्यक्ष प्रित्येश गवळी, ऍड. सुभाष राऊत, पंढरीनाथ बनकर, वैष्णवी सातव,अविनाश चौरे, मनीषा लडकत उपस्थित होते.