गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

येत्या १५ दिवसात ८० क्रीडा शिक्षकांची भरती; राज्य सरकारची माहिती

by India Darpan
ऑगस्ट 24, 2022 | 5:38 am
in संमिश्र वार्ता
0
vidhansabha

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर राज्यातील खेळाडू यश संपादन करीत आहेत. खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी 80 प्रशिक्षक यांची येत्या १५ दिवसांत नेमणूक करण्यात येईल. प्रत्येक तालुक्यात क्रीडा संकुल उभारणार असल्याची माहिती क्रीडा मंत्री गिरीष महाजन यांनी विधानसभेत दिली.

पुरस्कार विजेत्या खेळाडूंचा सन्मान होण्यासाठी प्रयत्न करु. १२४ तालुक्यात व्यायामशाळा सुरू करुन छोट्या गावात व्यायामशाळांना उत्तम दर्जाचे साहित्य पुरविले जाणार असल्याची माहिती मंत्री श्री. महाजन यांनी यावेळी दिली. ग्रामविकास विभागासंदर्भातील शाळा – महाविद्यालय देखभाल दुरुस्तीसंदर्भात तातडीने निर्णय घेण्यात येईल. पाणीपुरवठा व पथदिव्यांच्या देयकांचा प्रश्न सोडविण्यात येईल, असेही मंत्री श्री. महाजन यांनी सांगितले.

आश्रमशाळांसाठी ६०० कोटींची तरतूद
आश्रमशाळांसाठी ६०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. १२७ बांधकाम सुरू करण्यात आली असून, उर्वरित कामांना लवकरच मंजुरी देवून अपूर्णावस्थेतील आश्रमशाळा व वसतीगृहांचे काम प्राधान्याने पूर्ण करणार असल्याची माहिती आदिवासी विकास विभागाची मंत्री विजयकुमार गावित यांनी दिली.

मंत्री श्री. गावित म्हणाले, शबरी घरकुलासाठी ३०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत १ लाख ४२ हजार रुपयांची तर (MR Rigion) महानगर प्रदेशात १७ हजार २८० तर डोंगराळ व नक्षलवादी भागात १८ हजार २४० रूपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. जिल्हा रूग्णालयात मेडिकल कॅम्प देण्यात येतील. केंद्र शासनाच्या योजनेअंतर्गत आदर्श योजना नाशिक जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येणार असून यासाठी ६० टक्के अनुदान केंद्र सरकार तर ४० टक्के राज्य शासन देईल.

वसतीगृहात प्रवेश घेण्यासाठी स्वयंम योजनेंतर्गत निधी उपलब्ध करून देण्यात येईल. ११/१२ वी च्या तुकड्या वाढविण्यात येतील. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील २७ पाड्यांसंदर्भातील समस्या विविध विभागाशी समन्वय साधून सोडविण्यात येईल, असेही मंत्री श्री. गावित यांनी सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य हरिभाऊ बागडे, वर्षा गायकवाड, रवींद्र वायकर, संजय केळकर, सदस्य सुनिल प्रभू, हसन मुश्रीफ, आदित्य ठाकरे, आशिष जैस्वाल, चंद्रकांत नवघरे, संग्राम थोपटे, राहुल कुल, किशोर जोरगेवार, प्रकाश सोळंके, प्रशांत बंब, विनोद अग्रवाल, आदिती तटकरे, यशवंत माने, रईस शेख, भगवंतराव वानखेडे, विनोद त्रिकोले आदी सदस्यांनी सहभाग घेतला.

Sports Teachers Recruitment within 15 days

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मोठा निकाल! कैद्याच्या हत्येप्रकरणी तब्बल १५ जणांना फाशीची शिक्षा; जिल्हा न्यायालयाचा निर्णय

Next Post

जीन्स घालण्यास नकार दिल्याने पत्नीने केली पतीची हत्या

India Darpan

Next Post
jeans1

जीन्स घालण्यास नकार दिल्याने पत्नीने केली पतीची हत्या

ताज्या बातम्या

State Fencing Championship Nashik Team. 1

महाराष्ट्र राज्य तलवारबाजी स्पर्धेत नाशिकच्या १८ खेळाडूंची रजत आणि कास्य पदकांची कमाई..

जुलै 3, 2025
fir111

हॉस्पिटल बाबत तक्रार असल्याची धमकी देत डॉक्टरकडे पाच लाखाची खंडणीची मागणी…गुन्हा दाखल

जुलै 3, 2025
Screenshot 20250703 150541 Collage Maker GridArt

नाशिकमधील या नेत्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये केला प्रवेश…बघा, अधिकृत नावे

जुलै 3, 2025
Rahul Gandhi

३ महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांची आत्महत्या, ही आकडेवारी नाही तर उद्ध्वस्त घरे…राहुल गांधी यांची पोस्ट

जुलै 3, 2025
IMG 20250703 WA0179 1

ब्रँडेड एक्सचेंज फेस्टिव्हल… जुने कपडे आणा, नवे ब्रँडेड कपडे न्या !

जुलै 3, 2025
Gu6RydgXEAE8ag e1751527545356

शिवसेना ठाकरे गटाच्या नाशिक महानगर प्रमुखपदी प्रथमेश गीते यांची नियुक्ती…सुनील बागुल यांची हकालपट्टी

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011