नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिकमध्ये राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. नाशिक जिल्हा तलवारबाजी असोसिएशन आणि महाराष्ट्र राज्य तलवारबाजी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि फेन्सिंग फेडेरेशन ऑफ इंडिया यांच्या परवांनगीने आणि मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा होत आहे. येत्या ११ ते १४ डिसेंबर मिनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुल, हिरवाडी, पंचवटी येय़े ही स्पर्धा होणार आहे. १७ व्या कॅडेट गटाच्या १९ वर्षा आतील वयोगटाच्या मुलांच्या आणि मुलींच्या राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत देशभरातील १५०० पेक्षा अधिक खेळाडू सहभागी होणार आहेत.
या स्पर्धेत संपूर्ण भारतातून ३२ राज्यांचे मुलांचे आणि मुलींचे सुमारे १५०० खेळाडू सहाभागी होणार आहेत यामध्ये यजमान महाराष्ट्रासह दिल्ली, पश्चिम बंगाल, एस. एस. सि. बी., केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, छत्तीसगड, पोंडेचरी, गुजराथ, दिव-दमण, राजस्थान, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, ओरिसा, मिझोराम, मणीपुर, चंदीगड, अरुणाचल प्रदेश, आसाम, बिहार, तेलंगणा, झारखंड, नागालँड, चंदीगड, गोवा, मिझोराम, त्रिपुरा, पोंडेचरी याचा समावेश आहे.
या स्पर्धेच्या आयोजनासाठी ९० राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय पंच तांत्रिक समिति प्रमुख आपली जबाबदारी पार पडणार आहेत. खेळाडूंची निवास व्यवस्था क्रीडा संकुल आणि जनार्दन स्वामी आश्रम येथे करण्यात आली आहे, तर पंच, तांत्रिक समिती आणि पदाधिकारी यांची निवास व्यवस्था भक्ति संकुल, पंचवड आणि हॉटेल रिलॅक्स येथे करण्यात आली आहे. सर्व खेळाडू, पंच, पदाधिकारी यांची भोजन व्यवस्था क्रीडा संकुल येथे करण्यात आली आहे.
या स्पर्धेचे संपूर्ण चित्रण फेसबुकवर थेट लाइव्ह प्रक्षेपित करण्यात येणार आहे. या स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे खेळाडूंची जागतिक स्पर्धा आणि आशियाई स्पर्धा यासाठी निवड केली जाणार आहे. तर या स्पर्धेतील पहिले आठ संघ मध्य प्रदेश येथे आयोजित होणाऱ्या खेलो इंडिया या स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहेत.
फेन्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष माजी मंत्री सतेज पाटील, जेष्ठ क्रीडा संघटक अशोक दुधारे, डॉ. उदय डोंगरे, राजू शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. यासाठी विविध कामिटीं तयार करण्यात आल्या आहेत. यासाठी महाराष्ट्रातून आलेले पदाधिकारी, संघटक, प्रशिक्षक आणि राष्ट्रीय खेळाडू कार्यरत आहेत.
Sports National Fencing Competition Nashik Players