इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – भारतीय जंप रोप इतिहासात प्रथमच मोठ्या आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये भारताला २८ पदके मिळाली. क्वीन्स कप थायलंड ओपन जम्प रोप चॅम्पियनशिप ही थायलंडच्या बँकॉक येथे संपन्न झाली. त्यात ८ देशांच्या ९०० खेळाडूंनी भाग घेतला होता. या स्पर्धेत नाशिकमधून ६ स्पर्धक सहभागी झाले होते आणि सर्वांना पदके मिळाली.
स्पर्धेत पदक मिळालेल्या नाशिकच्या खेळाडूंमध्ये
राजुल लुंकड – २ रौप्य
मारवी हिरण – १ रौप्य
नियती छोरिया – १ कांस्य
नमन गंगवाल – १ कांस्य
वीर कुल्हारे- १ कांस्य
रोहन देशमुख- १कांस्य
यांचा समावेश आहे. या सर्व खेळाडूंना तन्मय कर्णिक, अशोक दुधारे, विक्रम दुधारे, चिन्मय देशपांडे यांचे मार्गदर्शन लाभले.
स्पर्धेचा तपशील असा
*सिंगल रोप ट्रिपल अंडर*
*१५ वर्षाखालील महिला :*
*रोप्या*
राजुला लुंकड
*३० सेकंद स्पीड रिले*
*१५ वर्षांखालील महिला: रौप्य*
1. मारवी हिरण
2. अंकिता महाजन
3. भार्गवी पाटील
4. राजुल लुंकड
*३० सेकंद स्पीड रिले*
*१५ वर्षाखालील महिला: कांस्य*
1. नियती छोरिया
2. भूमिका नेमाडे
3. श्रिया वाणी
4. तन्वी नेमाडे
*३० सेकंद स्पीड रिले*
*15 वर्षाखालील पुरुष: कांस्य*
1. ईशान पुथरान
2. रोहन देशमुख
3 .वीर कुल्हारे
4. नमन गंगवाल
Sports Jump rope Nashik Players Medal