नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – स्पोर्ट्स क्राफ्टद्वारे नाशिक मध्ये दुचाकी व चारचाकी आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा TSD (वेळ वेग अंतर) मध्ये होणार असून सुमारे ७५ किलोमीटरची नेव्हिगेशन रॅली आहे. स्पोर्ट्स क्राफ्ट ही संस्था एफ एम एस सी आय (भारतीयमोटरस्पोर्ट्सक्लब फेडरेशन) शी संलग्न असून आरटीओ नाशिकच्या सहकार्याने सुरक्षित ड्रायव्हिंग आणि रस्ता सुरक्षेला चालना देण्यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे .
“टीएसडीरॅली” म्हणजे “वेळ-स्पीड अंतररॅली (TIME SPEED DISTANCE),” ही एक मोटरस्पोर्ट्स स्पर्धा आहे जिथे ड्रायव्हर्स आणि नेव्हिगेटर्सने विशिष्ट मार्गाचे अनुसरण केले पाहिजे, अचूक वेगाचे पालन केले पाहिजे आणि अचूकतेवर लक्ष केंद्रित करून अचूक वेळी चेक पॉईंटवर पोहोचले पाहिजे. मूलतः, हे त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मार्ग पुस्तकावर लक्ष्य गाठण्यासाठी गणना केलेल्या वेगाने वाहन चालविण्या बद्दल आहे.
या स्पर्धेची सुरवात ९ मार्च २०२५ रोजी सकाळी आठ वाजता एसएसके वर्ल्ड क्लब, पाथर्डी, नाशिक,येथून सुरुवात होणार असून ग्रामीण भागात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे . हि स्पर्धा दुचाकी व चारचाकी अश्या दोन गटात होणार आहे . विजेत्यांना रोख बक्षिसे , चांदीची नाणी प्रमाणपत्रे आणि ट्रॉफी देण्यात येतील. तसेच काही विशेष बक्षिसे ठेवण्यात आले आहेत. १.सर्वोत्कृष्ट ज्येष्ठ संघ २. सर्वोत्कृष्ट तरुण संघ ३. सर्वोत्कृष्ट पती आणि पत्नी संघ 4. सर्वोत्कृष्ट महिला संघ ५. सर्वोत्कृष्ट वडील / आई मुलगी/मुलगा संघ
प्रवेश निकषः वैध ड्रायव्हिंग लायसन्स आणि RTO मान्यता प्राप्त वाहन असलेली व्यक्ती सहभागी होऊ शकते.
स्पर्धेत नाव नोंदणीसाठी ए. एन. एस. ऑटोमोबाईल, डिसूझा कॉलनी, शाहिद सर्कल जवळ नाशिकयांची संपर्क करावा अथवा अनिश: ९८२३३१८३३७ हर्षल ९५४५८५७४६७
Email: sportscraftnsk@gmail.com
Work Ph: 7020171541/9823318337
Website: www.sportscraft.co.in
Whatsapp: 9960001955/9011146999 या नंबरवर संपर्क करावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे .