इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – बिहारची राजधानी पाटणा येथील विमानतळावरून उड्डाण करणाऱ्या स्पाइसजेटच्या विमानाला आग लागल्याने ते परत उतरवावे लागले. लँडिंगनंतर सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. त्यानंतर आग आटोक्यात आणण्यात आली. या दुर्घटनेसंबंधीचे व्हिडिओ आता समोर येत आहेत. एका नवीन व्हिडीओमध्ये दिसते आहे की, आगीने पेटलेले विमान धावपट्टीवर उतरते आहे. आग लागलेले विमान लँडिंग करताना पाहून तुम्हालाही धक्का बसेल. मृत्यूला स्पर्श केल्यानंतर प्रवासी सुखरूप विमानतळावर पोहोचल्याचे दृश्य या व्हिडिओमध्ये आहे.
विशेष म्हणजे विमानाला आग लागली तेव्हा एअर होस्टेसकडून पायलटसाठी कोडवर्ड मागवण्यात आला होता. या एका कोडवर्डच्या वापरामुळे विमानातील १८५ जणांचे प्राण वाचले. वास्तविक, आग लागल्याचे पाहून एअर होस्टेसने पैन पैन ओरडायला सुरुवात केली. स्पाईसजेट फ्लाइट एसजी-७२३ च्या इंजिन क्रमांक एकला आग लागली. तेव्हा पायलटला पक्ष्याचा आवाज ऐकू आला होता. तरीही उड्डाण सुरूच होते. आग लागल्याचे पाहून एअर होस्टेसने पैन-पैन म्हणत पायलटला माहिती दिली. विमानाचे सारथ्य कॅप्टन मोनिका खन्ना या करत होत्या. त्यांनी अतिशय सावधगिरीने आग लागलेले इंजिन बंद केले. त्यानंतर नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला. त्यामुळे विमानाला तातडीने लँडिंगची परवानगी देण्यात आली. अखेर हे विमान धावपट्टीवर आले. त्यानंतर विमानातील प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. अग्निशमन दलांनी शर्थीचे प्रयत्न करुन विमानाला लागलेली आग विझवली.
https://twitter.com/kumarprakash4u/status/1538460133532938241?s=20&t=Ciwl4o6dblqvHm7lLUyRhw
spicejet flight fire burn codeword air hostes
https://twitter.com/flyspicejet/status/1538442812555165696?s=20&t=DzTu4vsi-6d3uwuIu8o1iw