नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सतत अडचणींचा सामना करत असलेल्या स्पाइसजेट या नागरी विमान वाहतूक कंपनीने मोठा निर्णय घेतला आहे. आपल्या तब्बल ८० वैमानिकांना कंपनीने बिनपगारी सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. त्यामुळे वैमानिकांमध्ये तीव्र असंतोषाचे वातावरण आहे. याचा परिणाम कंपनीच्या सेवेवरही होण्याची चिन्हे आहेत.
कंपनीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कंपनीचे हे तात्पुरते पाऊल असून कंपनीचे आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी उभे केले आहे. स्पाइसजेटने त्यांच्या ८० वैमानिकांना तीन महिन्यांच्या पगाराशिवाय रजेवर पाठवले आहे. त्यामुळे स्पाईसजेट या विमान कंपनीत सर्व काही सुरळीत सुरू नसल्याचे दिसते. तसेच या कंपनीत पैशाची आणि निधीची तीव्र टंचाई असून कोरोना काळापासून या कंपनीने खर्च कमी करण्यासाठी योग्य उपायांकडे लक्ष देणे सुरू केले आहे.
स्पाईसजेटचे ही काही मोजक्या एअरलाइन्सपैकी कंपनी असून ती प्रवाशांना कमी खर्चात हवाई प्रवास देते. पण सध्या कंपनीची आर्थिक परिस्थिती ठीक नाही. तसेच अलीकडच्या काळात विमानांमध्येही अनेक त्रुटी समोर आल्या आहेत. स्पाइसजेटने एअरलाइन्सने याबाबत सांगितले की, प्रचंड खर्चात तात्पुरता उपाय म्हणून काही कर्मचाऱ्यांना सक्तीच्या पाठवण्याचे पाऊल उचलण्यात आले आहे. कोणत्याही कर्मचार्याला कामावरून काढू नये या एअरलाइनच्या धोरणाशी सुसंगत हा उपाय आहे.
पगाराशिवाय ‘सक्तीच्या’ रजेवर पाठवलेले वैमानिक विमान कंपनीच्या बोईंग आणि बॉम्बार्डियरच्या ताफ्यातील आहेत. एका पायलटने सांगितले की, आम्हाला एअरलाइनच्या आर्थिक संकटाची जाणीव आहे, पण अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे आम्हाला धक्का बसला आहे. तीन महिन्यांनंतर कंपनीच्या आर्थिक स्थितीबाबतही अनिश्चितता आहे. रजेवर पाठवलेल्या वैमानिकांना परत बोलावले जाईल, असे आश्वासन दिले जात नाही.
सक्तीची रजा म्हणजे तुम्हाला रजा हवी नसेल तरी तुम्हाला रजा घेण्यास भाग पाडले जाते. अत्यावश्यक परिस्थितीमध्ये त्या व्यक्तीला स्थानबद्ध केले जाते किंवा सक्तीच्या रजेवर पाठवले जाते. सक्तीच्या रजेला फरलो असेदेखील म्हटले जाते. यामध्ये कंपनीच्या कर्मचाऱ्यांना अर्धा पगार दिला जातो. काही वेळेस पगारदेखील दिला जात नाही. पण आता या कोरोनाच्या काळात आणि त्यानंतर जवळ जवळ अनेक कंपन्यांनी सर्वांनाच सक्तीच्या रजेवर पाठवले आहे.
सध्याच्या तसेच काही माजी स्पाईसजेट कर्मचाऱ्यांनी सांगितले की, एअरलाइनने पायलटना सक्तीच्या रजेवर पाठवण्याची ही पहिलीच वेळ आहे. कोरोना महामारीच्या काळात परदेशी वैमानिकांना काढून टाकण्यात आले होते. तसेच सन २०२० पासून क्रू मेंबर्सना एकापेक्षा जास्त वेळा पगाराशिवाय रजेवर पाठवण्यात आले आहे. याशिवाय कर्मचाऱ्यांच्या पगारातही कपात करण्यात आली आहे. स्पाइसजेट गेल्या काही महिन्यांपासून प्रचंड तोट्यात असून त्याचा तोटा दिवसेंदिवस वाढत आहे. स्पाइसजेटचा तोटा ३० जून रोजी संपलेल्या तिमाहीत ७८४ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
Spicejet Airline Pilot Compulsory Unpaid Leave
Aviation Economical Loss DGCA Action
ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या WhatsApp वर हव्यात?
तर मग इंडिया दर्पणच्या दर्जेदार, विश्वासार्ह आणि गतिमान वृत्तसेवेचा लाभ घेण्यासाठी खालील ग्रुप जॉइन करा
https://chat.whatsapp.com/DdXKnEHFlqkD5F8S6etEPD