अलिबाग (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – छत्रपती संभाजी राजे व उद्योग मंत्री विजय सामंत हे एका महत्त्वाच्या बैठकीसाठी मुंबईहून अलिबागकडे एका खाजगी बोटीने जात असताना बोट धक्क्याला लागण्यापूर्वी समुद्रातील दोन खांबांवर आदळली, परंतु सुर्दैवाने कोणतीही दुर्घटना घडली नाही.
दोघेही मान्यवर या अपघातातून बालंबाल बचावले आहेत. यापूर्वी देखील असाच प्रकार घडला होता तसेच विमान असो की बोट यामधून प्रवास करणाऱ्या महत्त्वाच्या तथा व्हीआयपी व्यक्तींना अनेक वेळा अपघाताला सामोरे जावे लागले आहे, त्यामुळे महत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेबाबत वाहतूक सुरक्षा बाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
शिवराज्याभिषेकच्या ३५० सोहळ्यानिमित्त नियोजनासाठी अलिबाग येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीसाठी रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष संभाजीराजे ,पालकमंत्री सामंत हे दोघे एका खासगी बोटीतून मुंबईहून अलिबागला निघाले होते. मुंबई गोवा महामार्गावर रुंदीकरणाचे काम सुरू असल्याने वाहतूक कोंडी टाळण्यासाठी दोघेही मान्यवर बोटीने निघाले होते, अलिबाग येथील मुख्यालयात जिल्हा प्रशासन व पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक होणार होती.
दरम्यान, मांडवा जेट्टीजवळ आले असताना चालकाचे बोटीच्या वेगावरील नियंत्रण सुटून ती समुद्राच्या किनारा असलेल्या दोन खांबावर जाऊन आदळली. तेथून परत मागे येऊन जेट्टीवर थांबविण्यात आली. बोटीच्या अतिवेगामुळे मांडवा जेट्टीजवळ धक्क्याला न थांबता सुमारे ५० फुटपुढे भरकटत जाऊन किनाऱ्यावर आदळली. अकस्मितपणे बसलेल्या या धक्यामुळे ते बोटीतच पडले. सुदैवाने दोघाना कसलीही इजा झाली नाही.
Speed Boat Accident Uday Samant Sambhajiraje Save