नाशिक – शिंदे गटाबरोबर शिवेसनेचे १२ खासदार जाणार असल्याचे निश्चित झाल्यानंतर पोलिसांनी या खासदारांच्या सुरक्षेतेसाठी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नाशिक लोकसभा मतदार संघातील खासदार हेमंत गोडसे यांच्या घरासमोर व कार्यालयाबाहेर शस्त्रधारी पोलिसांचा बंदोबस्त देण्यात आला आहे. गोडसे यांच्या देवळाली येथील निवास्थानी व शालीमार येथील कार्यालयासमोर हा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसापासून १२ खासदार हे शिंदे गटाबरोबर जाणार असल्याची चर्चा होती. पण, त्यांचा निर्णय होत नव्हता. सोमवारी मात्र या खासदारांनी शिंदे गटाच्या बैठकीत ऑनलाईन सहभाग घेतला. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीत दाखल झाले. आज दिवसभर दिल्लीत घडामोडी होत असून खासदारांनी लोकसभा अध्यक्षांची भेट घेतली आहे. त्यामुळे खासदारांच्या सुरक्षतेसाठी आता पोलिस बंदोबस्त देण्यात आला आहे.