गुरूवार, जुलै 24, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

कृषी क्षेत्रात नाशिकसह राज्यातील या जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी….नाशिकच्या द्राक्षे आणि मनुकांना विशेष पुरस्कार

by Gautam Sancheti
जुलै 15, 2025 | 2:55 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20250715 WA0280

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- एक जिल्हा एक उत्पादन 2024 अंतर्गत महाराष्ट्राने चमकदार कामगिरी केली असून राज्याला ‘अ’ श्रेणीतील सुवर्ण पदक प्राप्त झाले आहे. यासह रत्नागिरी, नागपूर, अमरावती, नाशिक आणि अकोला या जिल्ह्यांनी कृषी आणि गैर-कृषी क्षेत्रातील आपल्या विशिष्ट उत्पादनांसाठी सुवर्ण, रौप्य, कांस्य आणि विशेष उल्लेख पुरस्कार पटकावले आहेत.

सोमवारी येथील भारत मंडपममध्ये राष्ट्रीय ‘एक जिल्हा, एक उत्पादन’ (ODOP) 2024 पुरस्कार सोहळयाचे आयोजन करण्यात आला. या कार्यक्रमास केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता आणि वाणिज्य व उद्योग राज्यमंत्री जितिन प्रसाद यांच्या प्रमुख उपस्थित पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. महाराष्ट्राने आपल्या उत्पादनांच्या नाविन्यपूर्णतेने, उच्च दर्जाने आणि वैशिष्ट्यपूर्ण गुणवत्तेने राष्ट्रीय स्तरावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले.

महाराष्ट्राची ‘एक जिल्हा, एक उत्पादन’ उपक्रमात सुवर्ण कामगिरी
‘एक जिल्हा, एक उत्पादन’ (ODOP) उपक्रम भारत सरकारचा एक महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे, ज्याचा उद्देश प्रत्येक जिल्ह्याच्या वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनांना प्रोत्साहन देऊन स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देणे आणि जागतिक बाजारपेठेत त्यांचा ठसा उमटवणे आहे. या उपक्रमांतर्गत 2024 च्या पुरस्कार समारंभात महाराष्ट्राने आपली उत्कृष्टता सिद्ध करून विविध श्रेणीत पुरस्कार मिळविले. हे पुरस्कार जिल्हा, राज्य आणि परदेशातील भारतीय दूतावास या तीन गटांमध्ये वितरित करण्यात आले. परदेशातील भारतीय दूतावासांनी या समारंभात दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभाग घेतला, ज्यामुळे या कार्यक्रमाला आंतरराष्ट्रीय स्तरावरही महत्त्व प्राप्त झाले. राज्यांच्या ‘अ’ श्रेणीत महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, पंजाब आणि उत्तर प्रदेश राज्यानेही सुवर्णपदक मिळवले आहे. राज्याच्यावतीने उद्योग संचालनालयाचे विकास आयुक्त दीपेंद्र सिंग कुशवाह यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

कृषी क्षेत्रातील महाराष्ट्राचे यश
महाराष्ट्राने कृषी क्षेत्रात आपली आघाडी कायम राखत विविध जिल्ह्यांच्या उत्पादनांना मान्यता मिळवली आहे. या अंतर्गत खालील जिल्‌ह्याना आपल्या वैशिष्ट्पूर्ण कृषी उत्पादनांसाठी पुरस्कार पटवावले :

नाशिकच्या द्राक्षे आणि मनुकांना विशेष उल्लेख पुरस्कार
नाशिकने आपल्या द्राक्षे आणि मनुकांसाठी (ग्रेप्स अँड रेझिन्स) कृषी क्षेत्रातील श्रेणी अ अंतर्गत विशेष उल्लेख पुरस्कार मिळवला. नाशिकच्या द्राक्षांनी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपले स्थान भक्कम केले आहे, आणि या यशाने नाशिकच्या कृषी क्षेत्रातील योगदानाला मान्यता मिळाली. हा पुरस्कार नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी स्वीकारला.

रत्नागिरीच्या हापूस आंब्याला सुवर्णपदक
जागतिक स्तरावर ‘आंब्यांचा राजा’ म्हणून ओळखला जाणारा रत्नागिरी जिल्ह्याचा हापूस आंबा यंदाही अव्वल ठरला आहे. कृषी क्षेत्रातील अ श्रेणीअंतर्गत जिल्ह्याने प्रथम स्थान मिळवले आहे. हापूस आंब्याची गोड चव, उत्कृष्ट गुणवत्ता आणि जागतिक बाजारपेठेतील मागणी यामुळे रत्नागिरी जिल्ह्याला हे यश मिळाले आहे. रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह यांनी पुरस्कार स्वीकारला.

नागपूरी संत्र्यांना रौप्यपदक
नागपूर जिल्ह्याच्या प्रसिद्ध संत्र्यांनी कृषी क्षेत्रातील अ श्रेणीअंतर्गत द्वितीय स्थान प्राप्त केले असून नागपूर संत्र्यांनी आपल्या रसाळ चवीने आणि जागतिक दर्जाच्या गुणवत्तेने देश-विदेशात ख्याती मिळवली आहे. या यशामुळे नागपूर जिल्ह्याचा कृषी वारसा आणखी समृद्ध झाला आहे. रौप्यपदकाचा पुरस्कार नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांनी स्वीकारला.

अमरावतीच्या मंदारिन संत्र्यांना कांस्यपदक
अमरावती जिल्ह्याने आपल्या मंदारिन संत्र्यांसाठी कृषी क्षेत्रातील अ श्रेणी अंतर्गत तृतीय स्थान मिळवले. संत्रा उत्पादनातील सातत्य, गुणवत्ता आणि बागायती क्षेत्रातील उत्कृष्ट प्रयत्न यामुळे अमरावतीने हे यश संपादन केले. अमरावती जिल्हा उद्योग केंद्रांचे महाव्यवस्थापक नीलेश निकम यांनी कांस्यपदकाचा पुरस्कार स्वीकारला.

गैर-कृषी क्षेत्रातील यश
अकोला जिल्ह्याने गैर-कृषी क्षेत्रातील श्रेणीतील ब अंतर्गत कापूस जिनिंग आणि प्रेसिंगसाठी विशेष उल्लेख पुरस्कार प्राप्त केला आहे. कापूस उत्पादन आणि प्रक्रिया क्षेत्रातील अकोल्याची प्रगती आणि औद्योगिक विकास यामुळे हा पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार जिल्हा उद्योग केंद्र, अकोल्याचे महाव्यवस्थापक संतोष बनसोड यांनी स्वीकारला.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

राज्यातील ७२ वरिष्ठ सरकारी अधिकारी, आजी- माजी मंत्री हनी ट्रॅपच्या जाळयात? नाशिकमधील एका बड्या अधिका-याचाही समावेश

Next Post

येवल्याच्या नागरीकास ३४ लाखाला गंडा घालणा-या सायबर भामट्यास ग्रामिण पोलीसांनी ठोकल्या बेड्या

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
jail11

येवल्याच्या नागरीकास ३४ लाखाला गंडा घालणा-या सायबर भामट्यास ग्रामिण पोलीसांनी ठोकल्या बेड्या

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आपल्या कामामध्ये सातत्य ठेवावे, जाणून घ्या,गुरुवार, २४ जुलैचे राशिभविष्य

जुलै 23, 2025
Screenshot 20250723 202955 Collage Maker GridArt

संजय राऊतांनी सरन्यायाधीश गवई यांना पाठवले नरकातील स्वर्ग पुस्तक….

जुलै 23, 2025
IMG 20250723 WA0286 1

नाशिक जिल्हा परिषदेतील या विभागातील १६ केंद्र प्रमुखांना विस्तार अधिकारी पदी पदोन्नती

जुलै 23, 2025
election 1

बिहारच्या मतदार यादीत १८ लाख मृत, २६ लाख स्थलांतरित व इतके लाख दुहेरी नोंदणी असलेले मतदार…

जुलै 23, 2025
rain1

राज्यात या भागात २५-२६ जुलै दरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज…नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

जुलै 23, 2025
election11

भारताच्या उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक…निवडणूक आयोगाने सुरू केली प्रक्रिया

जुलै 23, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011