गुरूवार, सप्टेंबर 11, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

श्रीअरविंद जन्मोत्सव लेखमाला-४२ – श्रीअरविंद : क्रांतिकारक ते महायोगी – समाधिस्थ

by Gautam Sancheti
सप्टेंबर 11, 2022 | 11:26 am
in इतर
0
IMG 20220911 WA0010

श्रीअरविंद जन्मोत्सव लेखमाला-४२
श्रीअरविंद : क्रांतिकारक ते महायोगी
समाधिस्थ

श्रीअरविंद ह्यांचे १९२० पासून ते १९५० पर्यंतच्या कालावधीतील छायाचित्र उपलब्ध नाही. एप्रिल १९५० मध्ये, हेन्री कार्टिअर-ब्रेसॉन या फ्रेंच छायाचित्रकाराला यांना श्रीअरविंदांची छायाचित्रे काढण्याची संधी प्राप्त झाली. त्यांनी काढलेल्या छायाचित्रांपैकी एक छायाचित्र दि. २४ एप्रिल १९५० या दर्शनदिनी काढण्यात आलेले आहे.(सोबत दिले आहे)

श्रीअरविंदांमध्ये १९४८ ते १९४९ च्या दरम्यान आजारपणाची काही लक्षणं आढळून आली. कालांतराने म्हणजे १९५० च्या मध्यावर पुन्हा एकदा ती दिसू लागली. डॉक्टरांशी सल्लामसलत चालू होती परंतु कोणतीही ठोस उपाययोजना स्वीकारण्यात आली नाही आणि दि. ०५ डिसेंबर १९५० रोजी पहाटे ०१ वाजून २६ मिनिटांनी श्रीअरविंदांनी देह ठेवला. ”श्रीअरविंदांनी देह ठेवण्याचा जो निर्णय घेतला त्याला पृथ्वीच्या आणि माणसांच्या ग्रहणशीलतेचा (Receptivity) अभाव कारणीभूत ठरला,” असे श्रीमाताजींनी म्हटले आहे.

श्रीअरविंद यांचा देह समाधि-स्थानी ठेवण्याची सारी व्यवस्था करण्यात आली होती पण सहा डिसेंबरला संध्याकाळी श्रीमाताजींनी पुढील संदेश प्रसृत केला की, “श्रीअरविंदांचा अंतिम संस्कार आज करण्यात आलेला नाही. त्यांच्या देहामध्ये ‘अतिमानसिक प्रकाशा’चे (Supramental Light) संघनीकरण झालेले असल्यामुळे, त्या देहावर विघटनाची कोणतेही चिन्ह दिसत नाही आणि जोवर तो देह जसाच्या तसा आहे तोवर त्यांचा देह तसाच ठेवण्यात येईल.” श्रीअरविंदांच्या देहाचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी हजारोंच्या संख्येने लोक उपस्थित होते.

दि. ०७ डिसेंबरला श्रीमाताजींनी लिहिले आहे – “हे प्रभू, तुमचे कार्य जोवर साध्य होत नाही तोवर तुम्ही आमच्या सोबत असाल, मार्गदर्शन आणि प्रबोधन करणारी केवळ चेतना म्हणूनच नव्हे तर, कृतीमधील गतिशील ‘उपस्थिती’ म्हणूनदेखील तुम्ही आमच्या सोबत असाल, असा विश्वास तुम्ही मला आज सकाळी दिला आहे. जोवर पृथ्वीचे रूपांतरण होत नाही तोवर तुमच्यामधील सारे सारेकाही येथेच राहील; तोवर तुम्ही पृथ्वीचे वातावरण सोडून जाणार नाही, असे अगदी निःसंशय पद्धतीने तुम्ही वचन दिले आहे. या अद्भुत ‘उपस्थिती’ ला आम्ही सुपात्र ठरू आणि आमच्यामधील प्रत्येक गोष्ट यापुढे, तुमच्या उदात्त कार्याच्या परिपूर्तीसाठी अधिकाधिक परिपूर्णपणे समर्पित व्हावी या एकाच इच्छेवर केंद्रित होवो, असे आम्हास वरदान द्या.”
देह ठेवल्यानंतर चार दिवसांनी म्हणजे दि. ०९ डिसेंबर १९५० श्रीअरविंदांचा देह आश्रमातील प्रांगणामध्ये समाधिस्थ करण्यात आला.

(क्रमशः)
(सौजन्य : अभीप्सा मराठी मासिक)
Special Article Series ShreeArvind Part42

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

शिंदे गटाला मोठा धक्का! लता सोनवणे यांची आमदारकी कुठल्याही क्षणी रद्द होणार; सर्वोच्च न्यायालयाने दिला हा निकाल

Next Post

मुख्यमंत्री आणि सरन्यायाधीश एकाच व्यासपीठावर; योग्य की अयोग्य? जयंत पाटील म्हणाले…

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

IMG 20250911 WA0337 1
स्थानिक बातम्या

हाय्रॉक्स मुंबई आंतरराष्ट्रीय स्पर्धेत नाशिकच्या स्ट्राईकिंग स्ट्रायडर्सचा चमकदार विजय

सप्टेंबर 11, 2025
image005V4IZ
संमिश्र वार्ता

सेनादलांतील या दहा महिला अधिकारी नऊ महिन्यांत २६ हजार सागरी मैलांचा प्रवास पूर्ण करणार…

सप्टेंबर 11, 2025
HYRYDER LE car 1 1
संमिश्र वार्ता

टोयोटा किर्लोस्‍कर मोटरकडून नवरात्री निमित्त ही ऑफर…१ लाख रूपयांहून अधिक फायदा

सप्टेंबर 11, 2025
ASHTAVINAYAK 2 1024x682 1
राज्य

अष्टविनायक विकास आराखडा….उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले हे निर्देश

सप्टेंबर 11, 2025
crime 88
क्राईम डायरी

नाशिकमध्ये वेगवेगळया भागात चार घरफोड्या…तीन लाखाच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला

सप्टेंबर 11, 2025
Untitled 11
संमिश्र वार्ता

धक्कादायक….महसूल अधिकाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी रेती माफियांकडून ड्रोनचा वापर

सप्टेंबर 11, 2025
ladki bahin yojana e1722514675247 750x375 1
संमिश्र वार्ता

लाडकी बहिण योजनेतील ऑगस्टचा सन्मान निधी तुमच्या खात्यात जमा झाला का? चेक करा बँक खाते

सप्टेंबर 11, 2025
crime1
क्राईम डायरी

नाशिकच्या महिलेसह तिघांना सव्वा कोटीला गंडा….अशी केली फसवणूक

सप्टेंबर 11, 2025
Next Post
1 682 1140x570 1

मुख्यमंत्री आणि सरन्यायाधीश एकाच व्यासपीठावर; योग्य की अयोग्य? जयंत पाटील म्हणाले...

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011