सोमवार, जून 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

श्रीअरविंद जन्मोत्सव लेखमालाः क्रांतिकारक श्रीअरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद-२५ः राजकीय इच्छापत्र

by India Darpan
ऑगस्ट 25, 2022 | 11:07 am
in इतर
0
IMG 20220825 WA0014 e1661405694673

श्रीअरविंद जन्मोत्सव लेखमालाः
क्रांतिकारक श्रीअरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद-२५ः
राजकीय इच्छापत्र

[श्रीअरविंद घोष यांची अलीपूरच्या कारावासातून सुटका झाली तो दिवस होता दि. ६ मे १९०९. आणि लगेचच म्हणजे दि. १९ जून रोजी त्यांनी ‘कर्मयोगिन्’ हे साप्ताहिक सुरु केले. राष्ट्रीय धर्म, साहित्य, विज्ञान आणि तत्त्वज्ञान यावर भाष्य करण्याच्या उद्देशाने त्यांनी हे साप्ताहिक सुरु केले होते. त्यामागची भूमिका त्यांच्याच शब्दांत जाणून घेणे उचित ठरेल… ]

“भारतीयत्व ही केवळ एक भावना आहे, अजूनही त्या विषयीचे ज्ञान स्पष्ट नाहीये. त्याबद्दल काही निश्चित अशी धारणा वा सखोल मर्मदृष्टी नाहीये. अजून आपण आपल्या स्वत:ला जाणून घ्यावयाचे आहे, आपण कोण होतो, कोण आहोत आणि कोण असणार आहोत; आपण भूतकाळात काय केले आहे आणि आपण भविष्यामध्ये काय करण्याची क्षमता बाळगतो, आपला इतिहास काय, आपले कार्य काय याविषयी आपण अनभिज्ञ आहोत…

‘कर्मयोगिन्’ने हे ज्ञान प्रचलित व प्रसारित करण्याचे पहिले आणि अत्यंत महत्त्वाचे कार्य हाती घेतले आहे. वेदान्त असो वा सूफिवाद असो, मंदिर असो वा मशीद असो, गुरु नानक, संत कबीर, समर्थ रामदास स्वामी, चैतन्य महाप्रभु किंवा गुरु गोविंदसिंह असोत, ब्राह्मण, कायस्थ आणि नामशूद्र असोत, कोणतीही राष्ट्रीय संपदा असो, मग ती अस्सल भारतीय असो किंवा आपण ती आपल्याप्रमाणे अनुकूल करून घेतलेली असो, ती ज्ञात करून घेणे आणि तिला तिचे योग्य स्थान देणे, तिची योग्यता ओळखणे हे ‘कर्मयोगिन्’ने आपले कार्य मानले आहे.

“राष्ट्रीय जीवन आणि त्याचे भविष्य घडविण्यासाठी या राष्ट्रीय संपदेचा कसा उपयोग करून घेता येईल हे पाहणे हे आमचे दुसरे कार्य होय. त्यांचे भूतकाळाच्या तुलनेत यथार्थ मूल्यमापन करणे सोपे आहे पण भविष्यात त्यांना त्यांचे योग्य स्थान देऊ करणे हे अधिक कठीण आहे.

बाहेरच्या जगाशी नाते
“बाहेरचे जग आणि त्याचे आपल्याबरोबर असलेले नाते आणि त्यांच्याबरोबर आपण कसा व्यवहार ठेवावा हे जाणणे ही तिसरी गोष्ट आहे. आत्ताच्या घडीला आम्हाला हाच प्रश्न अधिक अवघड आणि प्रकर्षाने पुढे आलेला दिसतो परंतु त्यावरील उपाय हा इतर सर्वांच्या उपायांवर अवलंबून आहे.”

पुढे लवकरच म्हणजे दि ३१ जुलै रोजी त्यांनी “An Open Letter to My Countrymen” या नावाचा लेख ‘कर्मयोगिन्’मध्ये प्रकाशित केला, त्यानंतर पुन्हा एकदा श्रीअरविंदांच्या मागे ब्रिटिशांचा ससेमिरा लागला. आपल्याला पुन्हा केव्हाही अटक होऊ शकते, याची जाणीव असल्यानेच त्यांनी हा लेख लिहिलेला होता. मी पुन्हा परतून येऊ शकलो नाही तर हे माझे ‘राजकीय इच्छापत्र’ आहे असे समजावे, असे त्यांनी या लेखामध्ये म्हटले होते. या लेखाच्या शेवटी सारांशरूपाने त्यांनी राजकीय कृतिकार्यक्रम काय असावा याची रूपरेषा मांडली होती.

(क्रमश:)
(सौजन्य : अभीप्सा मराठी मासिक)
Special Article Series ShreeArvind Part25

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

‘सुख म्हणजे काय असतं?’: शिर्के पाटलांच्या कुटुंबात होणार आणखी एका पाटलाची एन्ट्री

Next Post

वीज कनेक्शन बंद करण्यासाठी मागितली ५० हजारांची लाच; इंजिनीअरला रंगेहाथ पकडले

Next Post
प्रातिनिधीक फोटो

वीज कनेक्शन बंद करण्यासाठी मागितली ५० हजारांची लाच; इंजिनीअरला रंगेहाथ पकडले

ताज्या बातम्या

Maha Gov logo 07 1 1024x512 1

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतील नोंदणीची मुदत या तारखेपर्यंत वाढवली…

जून 2, 2025
Untitled 5

NEET परीक्षा पुढे ढकलली…न्यायालयाच्या निर्देशानंतर निर्णय

जून 2, 2025
वॉटर टॅक्सी सुरू करण्याबाबत बैठक 1 1 1024x683 1

वॉटर टॅक्सी सुरू करण्याबाबत मंत्रालयात बैठक….नियोजनाची सुरु झाली तयारी

जून 2, 2025
crime 1111

पत्ता विचारण्याच्या बहाण्याने दुचाकीस्वारांनी महिलेच्या गळयातील दीड लाखाची सोनसाखळी केली लंपास

जून 2, 2025
crime1

साड्या घेण्यासाठी आलेल्या ग्राहक महिलेने दुकानदार महिलेचे अंगावरील दागिणे असे केले लंपास…

जून 2, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

सिक्कीम येथे भुस्खलनामुळे राज्यातील अडकलेले ४० पर्यटक सुखरूप…

जून 2, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011