रविवार, ऑक्टोबर 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

श्रीअरविंद जन्मोत्सव लेखमालाः क्रांतिकारक श्रीअरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद-३ : क्रांतीकार्याची चाहूल

ऑगस्ट 3, 2022 | 10:54 am
in इतर
0
IMG 20220802 WA0015 e1659504239836

श्रीअरविंद जन्मोत्सव लेखमालाः
क्रांतिकारक श्रीअरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद-३
क्रांतीकार्याची चाहूल

शिष्यवृत्ती मिळवून श्रीअरविंद घोष इ. सन १८९० मध्ये केंब्रिज येथील किंग्ज कॉलेजमध्ये शिकू लागले. तेथे त्यांनी दोन वर्षे शिक्षण घेतले. त्यांचे वडील त्यांना भारतामधून वर्तमानपत्रे पाठवत असत. इंग्रजांनी भारतीयांना दिलेल्या वाईट वागणुकीची उदाहरणे असलेली कात्रणे खुणा करून ते पाठवून देत आणि भारतातील ब्रिटिश शासन हे निर्दयी व हृदयशून्य शासन आहे असे दोषारोप करणारी पत्रेदेखील ते पाठवत असत.

‘काही खळबळजनक आणि महान क्रांतिकारी बदल घडून येतील असा काळ जगाच्या इतिहासात येणार आहे आणि त्यामध्ये आपल्याला काही भूमिका पार पाडावी लागणार आहे’ अशी स्पष्ट जाणीव श्रीअरविंदांना वयाच्या अकराव्या वर्षीच झाली होती. आता त्यांचे लक्ष भारताकडे ओढले गेले आणि त्यांची ती संवेदना मातृभूमीच्या स्वातंत्र्याच्या दिशेने प्रवाहित झाली. पण हा ‘ठाम निश्चय’ पूर्णत्वाला जाण्यासाठी मात्र पुढची चार वर्षे जावी लागली.

गुप्त संघटनेत
ते केंब्रिजला गेले आणि तिथे ‘इंडियन मजलिस’ या संघटनेचे सदस्य आणि काही काळ सचिव झाले. तेव्हा त्यांनी क्रांतिकारक स्वरूपाची भाषणे दिली होती. लंडनमधील काही भारतीय विद्यार्थ्यांनी एक गुप्त संघटना स्थापन केली होती, त्या संघटनेचे नाव ‘Lotus and Dagger’ असे होते. त्या संघटनेमध्ये प्रत्येक सदस्य भारताच्या स्वातंत्र्यासाठी कार्य करण्याची आणि त्या ध्येयपूर्तीच्या दिशेने काहीतरी विशेष काम पुढे नेण्याची शपथ घेत असे. श्रीअरविंदांनी या संघटनेची स्थापना केली नव्हती पण त्यांच्या भावंडांसहित ते या संघटनेचे सदस्य मात्र झाले होते. पण ती संघटना अल्पजीवी ठरली. इंग्लंडमध्ये वास्तव्यास असणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांचा हा अशा प्रकारचा पहिलाच प्रयोग होता.

इ. स. १८९० मध्ये इंडियन सिव्हिल सर्व्हिसच्या खुल्या स्पर्धेत श्रीअरविंद घोष उत्तीर्ण झाले पण पुढील दोन वर्षांच्या कालावधीत घोडेस्वारीच्या परीक्षेस ते बसले नाहीत आणि त्यामुळे त्या सेवेसाठी ते बाद ठरले. श्रीअरविंद घोष स्वत:च्या विद्यार्थी-जीवनाविषयीची आठवण सांगताना म्हणतात की, ”मी कादंबऱ्या व कविता वाचत असे. मी फक्त परीक्षेच्या आधी काही काळ थोडा अभ्यास करीत असे. कधीही वेळ मिळाला की मी ग्रीक आणि लॅटिन पद्य लिहीत असे. पुढे जेव्हा मी शिष्यवृत्तीसाठी, केंब्रिजला किंग्ज कॉलेजमध्ये गेलो तेव्हा तेथे मि. ऑस्कर ब्राऊनिंग ह्यांनी माझे पेपर्स पाहिले आणि ‘असे इतके चांगले पेपर्स यापूर्वी मी कधीच पाहिले नव्हते’ असा शेरा त्यांनी दिला.”

(क्रमश: …)
(सौजन्य : अभीप्सा मराठी मासिक)
Special Article Series ShreeArvind Part 3

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

क्रांती दिनी होणार महाराष्ट्राच्या परिवर्तनाच्या क्रांतीची सुरूवात…संभाजीराजे छत्रपती यांचे ट्वीट

Next Post

महाराष्ट्रात मराठी भाषा शिकण्याचा प्रयत्न करावा; राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचा गुजरातींना सल्ला

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

indian army e1750762947859
महत्त्वाच्या बातम्या

सुवर्णसंधी! भारतीय सैन्यात अधिकारी व्हायचंय? येथे मिळेल मोफत प्रशिक्षण…

ऑक्टोबर 19, 2025
messi
महत्त्वाच्या बातम्या

स्वप्न सत्यात येणार… फुटबॉल सम्राट मेस्सीसोबत खेळण्याची सुवर्णसंधी… युवा फुटबॉलपटूंनो फक्त हे करा…

ऑक्टोबर 19, 2025
1002689727
मुख्य बातमी

निवडणूक आयोगाला मतदार याद्या सुधारायला सांगतोय मग, सत्ताधारी यावर का उत्तरं देतायेत? राज ठाकरे कडाडले

ऑक्टोबर 19, 2025
Untitled 79
महत्त्वाच्या बातम्या

उद्या आहे लक्ष्मीपूजन! असे आहे महत्त्व… अशी करा पूजा…

ऑक्टोबर 19, 2025
narak chaturdashi
महत्त्वाच्या बातम्या

इंडिया दर्पण – दीपोत्सव विशेष – आज आहे नरक चतुर्दशी – असे आहे महत्त्व

ऑक्टोबर 19, 2025
IMG 20251018 WA0011
महत्त्वाच्या बातम्या

कांदा प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी चिंचोंडी औद्योगिक वसाहतीत प्रकल्प…

ऑक्टोबर 18, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा रविवारचा दिवस… जाणून घ्या, १९ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 18, 2025
IMG 20251018 WA0021
महत्त्वाच्या बातम्या

नाशिकच्या सामन्यात… महाराष्ट्राचा सौराष्ट्र वर १० गडी राखून दणदणीत विजय…

ऑक्टोबर 18, 2025
Next Post
FZKF8o8aIAErgQK 1140x570 1 e1659504554982

महाराष्ट्रात मराठी भाषा शिकण्याचा प्रयत्न करावा; राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचा गुजरातींना सल्ला

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011