श्रीअरविंद जन्मोत्सव लेखमाला
– श्रीअरविंद : क्रांतिकारक ते महायोगी –
आश्रमाशी संपर्क
भारतीय स्वातंत्र्य चळवळीला नवी दिशा देणारे अग्रणी क्रांतिकारक आणि त्याचवेळी अखिल मानवाला पूर्णयोगाचे तत्त्वज्ञान आणि साधना प्रदान करणारे युगनिर्माते, द्रष्टे चिंतक श्रीअरविंद यांच्या १५० व्या जयंती वर्षानिमित्त (१५ ऑगस्ट १८७२ ते १५ ऑगस्ट २०२२) *इंडिया दर्पण* ने ही एक विशेष जन्मोत्सव लेखमाला वाचकांना सादर केली. १५ ऑगस्ट हा श्रीअरविंद यांचा जन्मदिवस. भारताच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आपण याच वर्षी साजरा केला. त्यानिमित्ताने दिनांक दि. १ ऑगस्टपासून सुरू केलेल्या या ४४ भागांच्या लेखमालेचा आज आपण समारोप करीत आहोत.
श्रीअरविंद यांच्या क्रांतिकार्याची आणि आध्यात्मिक क्षेत्रात त्यांनी निर्माण केलेल्या राजमार्गाची फारच कमी लोकांना माहिती असते… बंगालचे रहिवासी, इंग्लंडमध्ये शिक्षण, बडोद्यात नोकरी, स्वातंत्र्य लढ्यातील जहाल नेते आणि नंतर लढा सोडून पॉंडिचेरीत योगसाधनेसाठी निघून गेलेले श्रीअरविंद, एवढीच आपली माहिती असते. याचसाठी ‘इंडिया दर्पण’ ने श्रीअरविंद ह्यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी ही लेखमाला सादर केली. त्यासाठी पॉंडिचेरीच्या श्रीअरविंद आश्रमातर्फे प्रकाशित होणाऱ्या *अभीप्सा* मराठी मासिकाच्या संपादक आणि पूर्णयोगाच्या एक अभ्यासक प्रा. डॉ. केतकी मोडक यांनी खास ‘इंडिया दर्पण’ साठी ही लेखमाला लिहिली. पूर्वायुष्यातील क्रांतिकारक व पत्रकार आणि उत्तरायुष्यातील महायोगी तत्त्वज्ञ असा श्रीअरविंद यांचा जीवनपट संक्षिप्त स्वरूपात त्यांनी वाचकांसमोर मांडला. त्याला दुर्मिळ अशा छायाचित्रांची जोड दिली. ‘इंडिया दर्पण’ त्यांच्याबद्दल विशेष ऋण व्यक्त करीत आहे.
वाचकांच्या मागणीनुसार, श्रीअरविंद आणि श्रीमाताजी ह्यांच्या मराठीत अनुवादित केलेल्या पुस्तकांची सूची, ‘अभीप्सा’शी संपर्क आणि आश्रमाला भेट देऊ इच्छिणाऱ्यासाठी संपर्क सूत्र देत आहोत. श्रीअरविंद आश्रम ही साधकांची आंतरराष्ट्रीय वसाहत असून तेथे माणसाच्या परिपूर्ण जडणघडणी पासून ते त्याला रुची असलेल्या सर्व प्रकारच्या साधनांची निर्मिती साधक करतात. प्रत्येक बाबीत ‘परफेक्शन’ हा तेथील मूलमंत्र आहे. मुंबईहून रेल्वे अथवा विमानाने तेथे थेट जाता येते. आश्रमाचे गेस्ट हाऊस पर्यटक आणि जिज्ञासूंसाठी उपलब्ध आहेत.
अभीप्सा
श्रीअरविंद आणि श्रीमाताजी यांच्या विचारांना समर्पित मासिक ‘अभीप्सा’साठी संपर्क : 7757871425 (यावर wapp संदेश पाठवून चौकशी करावी). email : editorabhipsa2018@gmail.com , website : auromarathi.org
मराठी प्रकाशने
* माता * विचार-शलाका * योगाची मूलतत्त्वें * ईशोपनिषद् * श्रीगीता सारभूत अर्थ व संदेश * गीतेवरील निबंध * भारतीय संस्कृतीचा पाया * योग-समन्वय * दिव्य-जीवन (खंड १) * आदर्श बालक * चार तपस्या व चार मुक्ती * शिक्षण (भा. २) * प्रार्थना आणि ध्यान * सत्यगिरीचें आरोहण * श्रीमाताजींची व श्रीअरविंदांची उत्तरे. शिवाय * श्री अरविंदांची जीवनकथा
* साधकाची चिंतनिका (बारा भागांचा संपूर्ण संच) * जीवनदृष्टि
* श्रीमातृ-दर्शन श्रीमाताजींचें चरित्र * श्री अरविंद साधनापद्धती व मार्गदर्शन. * आजचा योग * सावित्री भावानुवाद.
श्रीअरविंद आणि श्रीमाताजी यांचे प्रमुख ग्रंथ भारतीय भाषांमध्ये अनुवादित करण्यात आले आहेत. हे विशाल साहित्य मिळण्याचे ठिकाण :
श्रीअरविंद बुक्स डिस्ट्रिब्यूशन एजन्सी (SABDA), श्रीअरविंद आश्रम, पाँडिचेरी ६०५००२. ( फोन : 0413 2233657 ) आणि
श्रीअरविंद सोसायटी, ‘सहकार’ बी रोड, चर्चगेट, मुंबई – ४०००२०.( फोन : 02222043076, वेळ 11 ते 6 )
पॉंडिचेरी श्रीअरविंद आश्रमाच्या चौकशीसाठी : ब्यूरो सेंट्रल विभाग, फोन – 0413 2233604
मुख्य वेबसाईट – www.sriaurobindoashram.org
Special Article Series ShreeArvind