विशेष लेखमाला…..
पितृपक्ष महात्म्य…
पितृपक्षात श्राद्ध करण्याचे १२ नियम
पितृपक्षामध्ये श्राद्ध करण्याची मोठी परंपरा आहे. किंबहुना हिंदु धर्मग्रंथांमध्ये त्याबाबत विविध प्रकारची माहिती दिली आहे. श्राद्ध कुणी आणि का करावे इथपासून ते कसे करावे, याचेही मार्गदर्शन मिळते. आज आपण श्राद्धासंबंधीचे १२ नियम समजून घेणार आहोत.
१. श्राद्ध कर्म करताना गायीचं दूध, तूप किंवा दही वापरावे.
२. श्राद्धात चांदीचे भांडी वापरावे. सर्व भांडी चांदीच्या नसल्यास तरी एखादं भांड तरी चांदीचे वापरावे.
३. श्राद्धात यशाशक्ती ब्राह्मण भोजन करवावे. शक्य नसल्यास एक तरी ब्राह्मणाला भोजन करवावे.
४. ब्राह्मणाला भोजन करवताना वाढत असलेल्या भांडी दोन्ही हाताने धरावे. भोजन दोन्ही हाताने प्रदान करावे.
५. ब्राह्मणाने भोजन मौन राहून करावे. मौन असल्यास पितर येऊन जेवण ग्रहण करतात म्हणून वाढणार्यांनी आणि जेवणार्यांनी मौन राहावे.
६. श्राद्धात मसालेदार पदार्थ नसावे तसेच पदार्थ पितरांच्या पसंतीचे असल्यास अती उत्तम असतं.
७. श्राद्ध स्वत:च्या घरात करावे. दुसर्यांच्या घरी श्राद्ध करणे अगदी चुकीचे आहे. तसेच तीर्थ स्थळ किंवा मंदिरात श्राद्ध करायला हरकत नाही.
८. धर्म शास्त्र ज्ञानी असलेल्या ब्राह्मणाला भोजन करवावे. कारण श्राद्धात पितरांची तृप्ती ब्राह्मणाद्वारे होते.
९. शक्य असल्यास श्राद्धात कुळातील मुली, जावई, नातवंड यांनाही प्रसाद ग्रहण करण्यासाठी बोलावावे.
१०. श्राद्धाच्यावेळी दारावर भिकारी आल्यास त्यालाही आदरपूर्वक भोजन करवावे. पितर कोणत्याही रूपात येऊ शकतात.
११. भोजन झाल्यावर ब्राह्मणांना घराच्या दारापर्यंत सन्मानपूर्वक विदा करावे. ब्राह्मण भोजनानंतर कुटुंबातील इतर लोकांनी प्रसाद ग्रहण करावे.
१२. श्राद्ध गुप्त रूपाने करावे. पिंडदानावर नीच लोकांनी दृष्टी पडल्यास ते पितरांपर्यंत पोहचत नाही.
श्राद्ध करणे शक्य नसेल तर काय करावे?
धर्मशास्त्रामध्ये श्राद्धाचे काही नियम सांगण्यात आले आहेत. त्यानुसारच श्राद्ध केल्यास पितरांच्या आत्म्याला शांती मिळते असे मानले जाते. विधीव्रत श्राद्ध कर्म करण्यासाठी वेळ आणि धनाची आवश्यकता असते परंतु तुम्ही विधीव्रत श्राद्ध कर्म करण्यास सक्षम नसाल तर काही सोपे उपाय करून पितरांना तृप्त करू शकता. यामुळे तुमचे पूर्वज तुमच्यावर क्रोधित होणार नाहीत.
पितरांनी स्वतः आपल्या प्रसन्नतेसाठी हे सोपे उपाय सांगितले आहेत. श्राद्ध पक्ष किंवा पितृ पक्ष आपल्या पितरांना स्मरण्याची संधी आहे. श्राद्ध पक्षात दररोज सकाळी नित्यकर्म केल्यावर पाण्यात काळे तीळ टाकून दक्षिण दिशेला तोंड करून पितरांना पाणी घालावं. श्राद्धाच्या दररोज सकाळी 9 वाजेच्या पूर्वी पितरांना पाणी घाला.
पितृपक्षात श्राद्ध केल्याने पितरांना समाधान मिळतं ज्यामुळे ते आनंदी होतात, परंतु काही लोकांना तिथी आणि पूजेची माहिती नसते. ज्यामुळे त्यांना श्राद्ध करता येत नाही. अश्या परिस्थितीत पितृदोषामुळे त्यांचा आयुष्यात बऱ्याच समस्या कायम राहतात. म्हणून पुराणानुसार, आपल्या पितरांना प्रसन्न आणि संतुष्ट करण्यासाठी काही विशेष उपाय देखील केले जाऊ शकतात.
तर हे उपाय करावे
* सकाळी अंघोळ करून तांब्याच्या लोट्यात पाणी भरून त्यामध्ये गायीचे कच्चं दूध, जवस, तीळ आणि तांदूळ घाला. मग दक्षिणेकडे तोंड करून त्या पाणी पिंपळाला घालावं. असे केल्यास पितरं प्रसन्न होतात.
* गायींना हिरवा चारा द्या आणि गोठ्यात जाऊन दक्षिणेकडे तोंड करून पाण्यात कच्चं दूध मिसळून पितरांना अर्पण करावे. याने पितरं प्रसन्न होतात.
* पितृपक्षात दररोज ब्राह्मणाला जेवू घालावं किंवा एखाद्या देऊळात बाह्मणाला दररोज अन्न सामग्री (गव्हाचे पीठ, तूप, फळ,गूळ आणि भाजी) देणगी द्या. त्याच बरोबर आपल्या श्रद्धेनुसार दक्षिणा द्या.
* सर्व पितृमोक्ष अमावसेला तांदुळाच्या पिठाचे पिंड करून त्यावर जवस आणि तीळ घाला. नंतर ते पांढऱ्या कापड्या मध्ये ठेवून पलाशच्या पानावर ठेवून नदीच्या प्रवाहात वाहून द्या.
* घरात ज्या ठिकाणी पिण्याचे पाणी ठेवतात तिथे सकाळ संध्याकाळ तुपाचा दिवा लावल्याने पितरं प्रसन्न होतात.
* गायीचे शेण वाळवून तयार केलेल्या गवऱ्या वर तूप आणि धुपकांडी पेटविल्याने पितरं प्रसन्न होतात.
पितरांचे राग शांत आणि त्यांना समाधानी करण्याचे हे सोपे उपाय आहे-
* गायीला चारा खाऊ घालावा.
* मूठभर काळे तीळ देणगी द्या.
* या व्यतिरिक्त आपण एक मूठभर काळे तीळ ब्राह्मणाला देणगी स्वरूपात दिल्यावर देखील आपले पितरं समाधानी होतात.
(छायाचित्र व संदर्भ सौजन्य – विकिपीडिया व धार्मिक ग्रंथ)