पितृपक्ष महात्म्य
कोण म्हणतं, पितृपक्षांत नवीन गोष्टींची खरेदी करू नये!
पितृपक्ष पंधवड्याबाबत आपल्याकडे अनेक धारणा आणि गैरसमजुती आहेत. यातील एक प्रमुख समज म्हणजे पितृपक्ष पंधरवड्याचा काळ अशुभ मानला जातो. त्यामुळे या कालावधीत नवीन गोष्टींची खरेदी करू नये, असे सांगितले जाते. यामुळे या कालावधीत अनेक उद्योग, व्यापारांची गती एकदम मंदावते. मात्र, ज्योतिषशास्त्र आणि धार्मिक ग्रथांमध्ये हा समज चुकीचा असल्याचे सांगितले आहे. या दिवसात कोणत्याही नवीन वस्तू खरेदी करणे अशुभ नसते, असे शास्त्र सांगते.
प्राचीन काळापासून पूर्वजांचे स्मरण करण्याची भारतीय परंपरा आहे. अगदी रामायण व महाभारतापासून याचे दाखले मिळतात. चातुर्मासातील भाद्रपद महिन्यात येणाऱ्या वद्य पक्षात प्रतिपदेपासून ते अमावास्येचा काळ हा पितृपक्ष पंधरवडा म्हणून पाळला जातो. या कालावधीत पूर्वजांचे स्मरण करून त्यांच्या नावाने श्राद्ध, तर्पण, पिंडदान केले जाते. या कालावधीत पूर्वज आपल्या वंशजांना भेटण्यासाठी पितृलोकातून पृथ्वीतलावर येतात, अशी समजूत आहे. त्यामुळे पूर्वजांना अन्न आणि पाणी अर्पण करून त्यांचे श्रद्धापूर्वक स्मरण केले जाते. यामुळे पूर्वज तृप्त होतात आणि वारसांना शुभाशिर्वाद देतात, अशी लोकमान्यता आहे.
पितृपक्ष पंधवड्याबाबत आपल्याकडे अनेक धारणा आणि समजुती आहेत. यातील एक प्रमुख समज म्हणजे पितृपक्ष पंधरवड्याचा काळ अशुभ मानला जातो. त्यामुळे या कालावधीत नवीन गोष्टींची खरेदी करू नये, असे सांगितले जाते. यामुळे या कालावधीत अनेक उद्योग, व्यापारांची गती एकदम मंदावते. मात्र, ज्योतिषशास्त्र आणि धार्मिक ग्रथांमध्ये हा समज चुकीचा आणि अनैतिक असल्याचे सांगितले आहे. या दिवसात कोणत्याही नवीन वस्तू खरेदी करणे अशुभ नसते, असे शास्त्र सांगते. मात्र याबाबत शास्त्रात उल्लेख आढळून येत नाही.
धारणांना आधार नाही
पितृपक्ष पंधरवड्याच्या कालावधीत खरेदी केलेल्या वस्तू, गोष्टी या पूर्वजांना समर्पित होतात, अशी धारणा काही ठिकाणी आढळते. तर काही ठिकाणी पूर्वजांचे स्मरण हे श्रद्धापूर्वक करावे. श्राद्ध, तर्पण, पिंडदान यांसारखे विधी करून पूर्वजांना नमन करावे. म्हणून या काळात नवीन काही खरेदी करू नये, अशी समज असल्याचेही दिसून येते. नवीन वस्त्रे, दागिने, वाहने खरेदी केल्यास पूर्वज नाराज होतात आणि वारसांना आशीर्वाद देत नाहीत, अशी लोकमान्यताही अनेक ठिकाणी असल्याचे पाहायला मिळते. मात्र, यातील कोणत्याही धारणा, समजूत आणि लोकमान्यतेला कोणताही आधार नाही, असे शास्त्र सांगते.
‘ही’ कार्ये करू नये
पितृपक्ष पंधरवड्यात गैरकृत्ये करू नयेत, खोटे बोलू-वागू नये, असे सांगितले जाते. पितृपक्षात कोणत्याही प्राण्याला, पक्षाला इजा पोहोचवू नये. विशेषतः गोमातेला सन्मानाची वागणूक द्यावी. अन्नदान करावे. तसेच कावळा, कबुतर आणि अन्य पक्षांनाही इजा करू नये. त्यांनाही धान्य आणि पाणी द्यावे. घरात आलेल्या पाहुण्यांचा अपमान करू नये. तसेच त्यांना भोजन दिल्याशिवाय जाऊ देऊ नये. त्यांचा यथोचित आदर, सन्मान करावा, असे सांगितले जाते.
पूर्वज होतात प्रसन्न
पितृपंधरवड्यात मुंज, विवाह, वास्तूशांती यांचे मुहूर्त नसतात. परंतु जागेची खरेदी, वाहनाची खरेदी, विवाह मिलनासाठी पत्रिका पाहणे, डोहाळे जेवण, जननशांतीसाठी, पंचाहत्तरी शांती आदी सर्व कार्ये करता येतात. यासाठी पितृपंधरवडा अशुभ निश्चित नाही, असे शास्त्र सांगते. ज्योतिषशास्त्रानुसार, पूर्वज आपल्या वारसांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीतलावर येतात. घरात नवीन आलेली वस्तू पाहून पूर्वज आनंदतात. वारसांची प्रगती पाहून पूर्वजांना समाधान मिळते. शांतता लाभते. त्यामुळे या कालावधीत श्राद्ध तर्पण विधी करताना दान-पुण्य करणे हिताचे ठरते, असे सांगितले जाते.
गणपती आणि दुर्गा देवीचे पाठबळ
श्राद्ध पक्षाला अशुभ मानणे चुकीचे असल्याचे शास्त्र सांगते. कोणत्याही कार्याची सुरुवात गणेश पूजनाने होते आणि पितृपक्षानंतर नवरात्रीला सुरुवात होते. यामुळेच विघ्नहर्ता गणेशाच्या स्मरणाने सुरू केलेले कार्य अशुभ मानले जाऊ शकत नाही. यासह दुर्गादेवीच्या आगमनाची चाहुलही याच कालावधीत लागते. अशा सर्व शुभ घटनांचा काळ पाठिशी भक्कमपणे असताना हा पक्ष अशुभ असू शकत नाही, असे शास्त्र सांगते. त्यामुळे या कालावधीत नवे वस्त्र, दागिने, वाहने, जागा आदी खरेदी करणे अशुभ ठरू शकत नाही, असे सांगितले जाते.
पंधरवड्यात शुभ योग
पितृपक्ष पंधरवड्यात सात सर्वार्थ सिद्धी योग, दोषसंघ विनाशक योग, दोन रवियोग, एक त्रिपुष्कर योग जुळून येत आहेत. कोणत्याही नवीन गोष्टींची खरेदी या काळात करणे अशुभ नसून, शुभ मानले जाते. व्यापार वृद्धिसाठी या कालावधीत अनेक नवीन योजना आणल्या जातात. त्यामुळे मनात कोणताही किंतू-परंतु न बाळगता खुशाल खरेदी करावी, असे सांगितले जाते.
(सौजन्य – विकिपीडिया व धार्मिक ग्रंथ )