इंडिया दर्पण विशेष लेख
महिला विश्वचषकाची लोकप्रियता
महिन्यापूर्वी ज्यावेळी महिला विश्वचषक स्पर्धा सुरु झाली त्यावेळी जवळपास सर्व महिला संघाना आपले सामने कोण बघणाऱ अशी सार्थ भिति वाटत होती कारण त्याचवेळी भारत – श्रीलंका, आस्ट्रेलिया – पाकिस्तान आणि इंग्लंड वेस्ट इंडीज अशा पुरुषांच्या क्रिकेट कसोटी मालिका चालू झाल्या होत्या. पुरुषांची सामने चालू असताना महिला क्रिकेट कोण बघणाऱ? ही शंका किंवा भीती व्यक्त केल्यावर आय सी सी म्हणजे जागतिक क्रिकेट संघटनेला जाहीर करावे लागले की इथून पुढे महिला विश्वचषकाचे कोणतेही (कसोटी, एकदिवसीय किंवा २० षटकांचे) सामने आणि पुरुषांचे सामने एकाच वेळी भरविले जाणार नाही , त्यांना वेगवेगळा स्लॉट दिला जाईल. तथापि न्यूझीलंड मध्ये चालू असलेल्या महिला विश्वचषक सामन्याना मिळालेला तुफान प्रतिसाद बघता आता पुरुष संघाना भिती वाटत असेल.
महिला क्रिकेटला इतकी प्रसिद्धी आणि प्रतिसाद मिळाला याचे कारण महिलाची क्रिकेटमधील प्रगती. आस्ट्रेलिया, इंग्लंड, द आफ्रिका , भारत, न्यू झीलंड आणि विंडीज महिला क्रिकेटपटूचा दर्जा हा कोणत्याही पुरुष संघाइतकाच अव्वल आहे हे पहायला मिळाले. पाकिस्तान आणि बांगलादेश यांना अनुभव कमी आहे तरीही त्यांचा खेळ दुर्लक्ष करण्यासारखा आजिबात नाही.महिला क्रिकेटचे सामने वारंवार झाले तर महिलाही पुरूष क्रिकेटपटू इतक्याच उत्तमपणे खेळू शकतात हे आस्ट्रेलिया , इंग्लंड आणि द आफ्रिका महिलाचा खेळ पाहिल्यास सहज लक्षात येते.
महिला फलंदाज (मोजकी नावे घ्यायची तर Lanning आणि Healy (आस्ट्रेलिया) , Sciver आणि Dunkley ( इंग्लंड), Volwaart आणि Du Preez ( द आफ्रिका), हर्मनप्रीत कौर आणि स्मृति मनधाना ( भारत) या कोठेही पुरूष खेळाडूपेक्षा कमी नाही हे दिसून आले.
किंबहुना आपण पुरुषांचाच खेळ पाहत आहोत असे वाटले इतक्या त्या technically perfect आहेत . त्यांचा stamina तसेच फटक्यांची विविधता आणि शैली ही अचंबित करणारी आहे . भारता विरूध्द आस्ट्रेलियाची कर्णधार Lanning ने जी बहारदार फलंदाजी केली त्याला तोड नाही . भारताने खरं तर २७८ धावांचा डोंगर केला होता पण Lanning ने तो लीलया पार केला. गोलंदाजीत विशेषत: फिरकी गोलंदाजीत तर अनेक महिला क्रिकेटपटू अधिक सरस आहेत ! जलदगतीत आस्ट्रेलियाची Mcgrath, ईंग्लंडची Eccleston ,द आफ्रिकेची इस्माईल, भारतीय झुलान गोस्वामी, विंडीजच्या Frazer आणि Matthews इ यांची तर दहशतच आहे.
महिला खेळाडूचे क्षेत्ररक्षत्रण तर केवळ लाजवाब आहे . एकही misfield पहायला मिळाले नाही , काही अफलातून झेल पहायला मिळाले तसेच उत्तम पिक अप आणि थ्रो देखील दाद देण्यासारखे आहेत. जगातील अव्वल चार संघ ( अर्थातच आस्ट्रेलिया, द आफ्रिका, इंग्लंड आणि वेस्ट इंडीज) बाद फेरीत पोहोचले ते केवळ सर्वांगीण गुणवत्तेवरच आणि त्यांच्यातील उपान्त्य आणि अंतिम सामने रोमहर्षकच होणार यात शंकाच नाही.
भारत मागील विश्वचषक स्पर्धेत यजमान इंग्लंड विरूध्दअंतिम सामन्यात जिंकता जिंकता हरला ( ३ बाद १९३ वरुन सर्वबाद २१९ , फक्त ९ धावांनी पराभूत!) त्यामुळे भारत किमान बाद फेरी गाठेल अशी खात्री होती पण साखळीत इंग्लंड आणि न्यू झीलंड विरूध्दचे मोठे पराभव आणि द आफ्रिकेविरूध्द शेवटच्या षटकांतील दीप्ती शर्माचा No ball, झुलान गोस्वामीची अनुपलब्धता आणि द आफ्रिकेने शेवटच्या दोन तीन षटकात अचानक केलेली पाच चौकारां ची बरसात तसेच फलंदाजीत भारताने शेवटच्या हाणामारीच्या दहा षटकात केलेली संथ फलंदाजी ( फक्त तीन चौकार!)भारताला महागात पडली. चाळीसव्या षटकापर्यंत आपण ३०० च्या पुढे जाऊ असे वाटले होते पण त्या २०-३० धावा कमी पडल्या असे आता येथे बसून म्हणता येइल.
सरतेशेवटी महिला खेळाडूच्या लोकप्रियते मुळे महिला आय पी एल लवकरच सुरु होणार हे निस्चित आणि त्यामुळे आपल्याला दर्जेदार महिला क्रिकेट सामने पहायला मिळणार हेही निश्चित!