बॅडमिंटनमधील लख्ख तारा स्मित तोष्णीवाल
नाशिकच्या शिवसत्य मंडळ येथे बॅडमिंटन प्रशिक्षक मकरंद देव यांच्या तालमीत जवळजवळ १० वर्षे कसून तयार झालेली स्मित तोष्णीवाल ही गेली तीन वर्षे हैदराबाद येथील चेतन आनंद अकादमीत माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू चेतन आनंद यांच्याकडे adavanced training घेत आहे आणि त्यामुळे सातत्याने आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळत आहे आणि गाजवीत आहे. कालच ( ता २९ मे ) तिने Austria येथे कांस्य पदकाची कमाई केली.

लेखक हे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आहेत.
मो. 9422770532
चीन तैपेईच्या प्रथम मानांकित वेन ची हुसु कडून तिला जरी २१-१४, २१-१६ असा पराभव पत्करावा लागला असला तरीही दोन्ही गेम्स मध्ये सुरुवातीला स्मित ने आघाडी घेतली होती (२-४, ६-६ ) हे लक्षात घेतले पाहिजे. एकच आठवड्यापूर्वी तिने स्लोवेनिया येथील स्पर्धेत रौप्यपदक मिळविले होते . मुख्य म्हणजे जानेवारी मध्येच तिने कटक येथे ओरिसा ओपन या सुपर १०० आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सरळ अंतिम फेरीत धडक मारली होती पण तेथे ती उपविजेती ठरली.
गेली तीन वर्षे २१ वर्षीय स्मित चेतन आनंद यांच्या मार्गदर्शना खाली जागतिक दर्जाचे खेळाडू आणि जागतिक दर्जाच्या स्पर्धा याचा अनुभव मिळावा म्हणून जगभर विविध स्पर्धांमध्ये खेळते आहे आणि या अनुभव आणि exposure मुळे तिच्या खेळात आणि ranking मध्ये इतकी सुधारणा झाली आहे की अलीकडील जवळपास सर्व स्पर्धात ती seeded player म्हणून खेळत आहे ! तिचे आज जागतिक ranking 113 आहे!
” Smit is very confident and ambitious but she lacked strength and endurance so also mental toughness in tight matches. We worked on all these and now you can see the result. She has become super confident and hungry. ” हे उद्गार आहेत तिचे प्रशिक्षक चेतन आनंद यांचे.
स्मित नाशिकमध्ये असे पर्यंत तिने सर्व वयोगटातील राज्य आणि राष्ट्रीय विजेतेपद पटकावले होते हे विशेष. नाशिकची दुसरी प्रज्ञा गद्रे किंवा पहिली स्मित तोष्णीवाल होण्याची पूर्ण क्षमता स्मित मध्ये आता दिसत आहे . योगायोगाने दोघीही मकरंद देव यांच्याच शिष्या आहेत आणि त्यांच्याच सल्ल्याने अतिप्रगत प्रशिक्षण मिळवण्यासाठी प्रज्ञा हैदराबादला गोपीचंद यांच्याकडे गेली आणि भारतातील क्रमांक एक् ची दुहेरी खेळाडू बनली तर स्मितची वाटचालही हैदराबादलाच एक मोठी आंतरराष्ट्रीय खेळाडू होण्याकडे ( पण सिंगलची ) होत आहे.
जगातील अव्वल अशा सुपर १०० आणि सुपर ३०० स्पर्धा ती सातत्याने खेळत आहे आणि आपले गुणांकन (points) आणि मानांकन ( ranking )वाढवीत आहे. ती या प्रकारे यश मिळवित राहिली तर सिंधू सायना नंतरच्या पिढीतील भारताचे एक आशास्थान म्हणून तिच्याकडे पाहता येइल. अर्थात त्यासाठी सातत्य, फिटनेस, फोकस आणि Form या गोष्टींवर तिला कायम लक्ष केंद्रित करावे लागेल.