भारतीय नेमबाजीतील नवी आशा : आर्या बोरसे
१९९६ साली सुप्रसिद्ध क्रीडा मानस शास्त्रज्ञ भीष्मराज बाम पोलिससेवेतून निवृत्त झाले आणि त्यांनी उर्वरित आयुष्य नाशिक येथे व्यतीत करण्याचा निर्णय घेतला. हाच निर्णय नाशिकमधील नेमबाजी (shooting) खेळाला कलाटणी देणारा ठरला. बाम सर स्वतः उत्कृष्ट राष्ट्रीय दर्जाचे नेमबाज होते त्यामुळे त्यांनी नाशिकमध्ये जी थोडीफार हौशी नेमबाजी चालत तिला संघटना स्थापन करुन एक आगळेवेगळे रुप दीले. तसेच महाराष्ट्र राज्याची नेमबाजीची क्रीडा अकादमी नाशिक येथे जोरदार प्रयत्न करुन आणली.

लेखक हे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आहेत.
मो. 9422770532
बाम सरांच्या सुरुवातीच्या batch मधील जे काही नेमबाज राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकले आणि आजही चमकत आहे, शिवाय ज्यांनी खेळाडू म्हणून करिअर संपल्यानंतर जे प्रशिक्षक म्हणून कारकीर्द गाजवित आहे. अशा मोजक्या खेळाडूत Precise Shooting Club चा अभय कांबळे याचे नाव घ्यावे लागेल.
त्याची एक शिष्या आहे आर्या बोरसे जी त्याच्याकडे २०१७ पासून शिकते आहे , तिचे भारतीय जुनियर संघात (U 21) १० मे पासून जर्मनी येथे सुरु होणाऱ्या जुनियर विश्वचषकासाठी निवड झाली आहे. आणि रायफल शूटिंगसाठी नाशिकची आणि आंतरराष्ट्रीय दर्जा सिध्द करणारी पहिली खेळाडू आहे असे प्रशिक्षक अभय कांबळे सार्थ अभिमानाने सांगतों.
” करोना काळात ती पूर्ण form मध्ये असूनही तिला खेळता आले नाही पण तिने जिद्द न सोडता चिकाटीने माझ्याशी नियमित संपर्क साधत घरी Dry Practice केली. त्याचा परिणाम म्हणजे या सवयीमुळे ती Capt ईझिकेली या राज्य पातळीवरील आणि फक्त नवोदितांसाठी असलेल्या या स्पर्धेत १० मी गटात पहिली आली .” असे अभय सांगतो.
त्यानंतर तिने मागे वळून पाहिलेच नाही. राज्य आणि राष्ट्रीय तसेच शालेय स्पर्धांमध्ये सातत्याने उत्तम score करीत आणि बक्षिसाची लयलूट करीत राष्ट्रीय निवड समितीला दखल घ्यायला लावली.
तिचे ‘खेलो इंडिया’ या योजनेत निवड झाली तसेच लक्ष्य या भारतातील अव्वल आठ खेळाडूसाठी असलेल्या योजनेअंतर्गतही निवड झाली. मुख्य म्हणजे या सर्व Trials मध्ये तिने पहिला किंवा दुसरा क्रमांक सोडला नाही .
सातत्याने चांगला स्कोर देत ह्या फक्त १९ वर्षे वयाच्या चिमुरडीने विश्वचषक निवड पात्रताफेरीत ६३०:८० इतक उत्तम स्कोर दोन्ही Trials मध्ये आजिबात दबाव न घेता केला आणि तिची भारतीय संघात रमिता आणि झिना खित्ता यांच्यासह निवड झाली आहे .
आर्या एकेरी आणि मिश्र दुहेरीमध्ये भारता तर्फे प्रतिनिधित्व करण्याची उत्तम संधी मिळालेली आहे त्याचे ती चीज करणाऱ असा विश्वास नव्हे खात्री अभय कांबळे याना आहे . कारण त्याने तिला केवळ तांत्रिकच नव्हे तर मानसिकही उत्तम मार्गदर्शन केले आहे.
” Shooting हा खेळ खेळाडूवर प्रचंड मानसिक दबाव आणतो त्यामुळे ऐनवेळी नेमबाज चूक करतो असा अनुभव आहे तथापि आर्या तांत्रिक आणि मानसिक दोन्ही आघाडीवर अतिशय कणखर आहे हे तिने वेळोवेळी सिध्द केले आहे . ती भारताला जुनियर विश्वचषक स्पर्धेत पदक मिळवून दिल्याशिवाय राहाणार नाही असे मला वाटते.
माझ्या प्रशिक्षक म्हणून कारकिर्दीतील तो सर्वोच्च क्षण असेल ” असा स्पष्ट मत अभयने व्यक्त केल्यावर आपण फक्त १० मे पासून सुरु होणाऱ्या विश्वचषकाची आतुरतेने वाट पाहू या!