रविवार, सप्टेंबर 14, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

नाशिक जिल्हा क्रिकेट संघटना निवडणूकः असा आहे संघटना आणि निवडणुकीचा रंजक इतिहास

by Gautam Sancheti
मार्च 31, 2022 | 12:09 pm
in इतर
0
cricket

 

नाशिक जिल्हा क्रिकेट संघटना निवडणूक

१९५५ साली अनौपचारिकरित्या आणि १९७२ पासून अधिकृतपणे स्थापन झालेल्या नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेच्या पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्य यांची दर तीन वर्षांनी होणारी निवडणूक १९८७ पर्यंत बिनबोभाट आणि चर्चेविना होत असे. पण त्यानंतर मात्र नाशिकमधील क्रिकेट हवे तसे वाढले नाही , नाशिकमधील खेळाडू चांगले खेळूनही महाराष्ट्राकडून रणजी संघात घेतले जात नाही आणि खेळाडूना हव्या तशा सुविधा ( मुख्यतः टर्फ विकेट इ )मिळत नाही अशा रास्त तक्रारी येउ लागल्या आणि खेळाडूसह दत्ता आहेर , अशोककुमार पाटील , शशांक सामंत , बंबुशेट जैन, प्रभाकर लोणारी इ च्या पुढाकाराने क्रिकेटशौकीन एकत्र आले आणि त्यांनी ना जि क्रि संघटनेला सदस्य संख्या मोजक्या निवडक १०० वरुन ७०० पर्यंत वाढवण्यासाठी माफक संघर्ष करून भाग पाडले आणि नाशिकचे क्रिकेट कायमचे पण चांगल्यासाठी बदलले.

Deepak odhekar
दीपक ओढेकर
लेखक हे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आहेत.
मो. 9422770532

संघटनेत नवे तरुण आणि खेळलेले पदाधिकारी आले . त्यांनी नवे विचार, आधुनिक योजना आणि सुविधा आणल्या. तथापि डॉ पुराणीक , व्हि पी बागूल आणि त्यांच्या सहकार्यांनी नाशिकमधील क्रिकेट सुमारे तीन दशके आपल्या परीने जिवंत ठेवले ही मान्य केलेच पाहिजे. नाशिकमधील क्रिकेटने त्यानंतर मोठी उडी घेतली ती २००३ मध्ये विनोद शहा आणि त्याच्या साथीदार यानी संघटनेचा कारभार हाती घेतल्यानंतर आणि त्याचवेळी महाराष्ट्र क्रिकेट संघटना अजय शिर्के यांच्या (संघर्ष करुन) ताब्यात आल्यावर.
महाराष्ट्र राज्य क्रिकेट संघटनेत आणि महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या संघात नाशिकला न्याय्य स्थान मिळाले. फक्त पुण्यातील खेळाडू संघात घेण्याची प्रथा कायमस्वरूपी बंद झाली. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या समित्यांवर महत्त्वाच्या पदांवर नाशिकला सातत्याने स्थान मिळत गेले तर गुणवत्ता असलेले सत्यजित बचछाव, माया सोनावणे, ईश्वरी सावकार इ सारखे खेळाडू राज्याच्या संघात आणि पुढे विभागीय तसेच Challenger सारख्या महत्त्वाच्या स्पर्धेत खेळताना दिसत आहेत . हे केवळ येथे जिल्हा संघटनेने उपलब्ध करुन दिलेल्या सुविधा आणि संधी याचे फळ आहे हे मान्य केले पाहिजे.

सर्व वयोगटातील सर्व सामने गेल्या १५ वर्षे टर्फ विकेटवर आणि वर्षभर सुमारे ४०० च्या आसपास सामने तेही ३ ते ४ मैदानावर तसेच वर्षभर चालणारे कोचिंग Camps अशा व्यावसायिक पध्दतीने संघटना काम करते आहे . हे करण्यासाठी लागणारे भरभक्कम आर्थिक पाठबळ संघटनेने लाइफ मेंबर्स वाढवून आणि काही क्रिकेटप्रेमी हितचिंतकांच्या पाठिंब्यावर तसेच स्थानिक सर्व पक्षीय पुढाऱ्यांनी वेळोवेळी केलेल्या मदतीने उभे केले आहे. पुण्याखालोखाल नाशिक हे महत्वाचे क्रिकेटकेंद्र म्हणून मानले जाते कारण नाशिकमध्ये २००५ पासून २०१९ तब्बल १२ रणजी सामने , राज्य संघटनेचे आंतरजिल्हा सामने आणि बी सी सी आय चे अनेक सामने भरविण्याची जबाबदारी राज्य संघटनेने ना जि संघटनेचे काम आणि अनुभव पाहूनच दिली असणार.
तर अशा संघटनेची पुढील तीन वर्षांची कार्यकारिणी निवडून देण्यासाठी निवडणूक शनिवारी (९ एप्रिल) होत आहे आणि त्यासाठी २७६० आजीव सदस्य आणि ६२ रजिस्टर्ड संस्थाचे प्रतिनिधी असे जाणकार मतदार मतदान करतील आणि त्यांना नाशिकच्या क्रिकेटच्या हिताची चिंता असल्याने ते योग्य व्यक्ती आणि पॅनललाच मत देतील यात शंका नाही.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिकरोड – सामनगावरोड युवकावर धारधार शस्त्राने वार; हल्ला करुन हल्लेखोर फरार

Next Post

कोलोरेक्टल कर्करोग म्हणजे काय? अशी असतात त्याची लक्षणे

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

modi 111
राष्ट्रीय

पंतप्रधानाच्या हस्ते मणिपूरमध्ये १२०० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन…

सप्टेंबर 14, 2025
भोसला डिफेन्स युनिव्हर्सिटीसंदर्भात विविध क्षेत्रातील तज्ज्ञांसोबत चर्चा1 971x420 1
संमिश्र वार्ता

भोसला डिफेन्स युनिव्हर्सिटी संरक्षण उत्पादन उद्योगासाठी सहाय्यभूत ठरेल…मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सप्टेंबर 14, 2025
Kia Range 1
संमिश्र वार्ता

किया इंडियाची घोषणा…ग्राहकांना मिळणार १.७५ लाख रूपयांपर्यंत हा फायदा

सप्टेंबर 14, 2025
crime1
क्राईम डायरी

पत्ता विचारण्याचा बहाणा करुन महिलेची अशी केली फसवणूक…पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

सप्टेंबर 14, 2025
rain1
महत्त्वाच्या बातम्या

या दोन दिवसात महाराष्ट्रात अतिजोरदार पाऊस…बघा, हवामानतज्ञांचा अंदाज

सप्टेंबर 14, 2025
IMG 20250913 WA0446
महत्त्वाच्या बातम्या

अपघाती मृत्यू प्रकरणी वारसांना एक कोटींची भरपाई… लोकन्यायालयामध्ये प्रकरण निकाली

सप्टेंबर 14, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींच्या घरामध्ये आनंदी वातावरण असेल, जाणून घ्या, रविवार, १४ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 13, 2025
crime 13
क्राईम डायरी

स्टोव्हच्या भडक्यात गंभीर भाजलेल्या ८५ वर्षीय महिलेचा मृत्यू

सप्टेंबर 13, 2025
Next Post
IMG 20220331 WA0007

कोलोरेक्टल कर्करोग म्हणजे काय? अशी असतात त्याची लक्षणे

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011