बुधवार, ऑक्टोबर 8, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

सूर्यकुमार यादव… अफलातून फटके… गोलंदाजांची धुलाई… पुस्तकाबाहेरचा सूर्य… भारुड आणि बरंच काही…

नोव्हेंबर 9, 2022 | 11:31 am
in इतर
0
Suryakumar Yadav e1667752637766

इंडिया दर्पण विशेष लेख
पुस्तकाबाहेरचा सूर्य

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज सुर्यकुमार यादवची जगभरातच जोरदार चर्चा आहे. त्याचे कारण म्हणजे, त्याचे अफलातून फटके, गोलंदाजांची धुलाई आणि धावांचा पाऊस. त्याच्या या अनोख्या वैशिष्ट्य आणि फलंदाजीबद्दल लिहित आहेत ज्येष्ठ क्रीडा समीक्षक जगदीश देवरे…

सुनिल गावस्कर, सचिन तेंडुलकर यांच्यासारख्या फलंदाजांना बॅटींग करतांना बघत बघत मोठे झालेले आम्ही भारतीय क्रिकेटचे चाहते आहोत. क्रिकेटच्या पुस्तकात ‘कव्हर ड्राईव्ह’ कसा मारायचा याबद्दल एक नियम दिलाय, आणि तो तसाच मारायचा असतो हे या दोघांना अचूक माहिती होतं. त्यामुळे त्यांची फलंदाजी बघतांना एक ‘वृत्तबध्द कविता’ वाचत असल्यासारख वाटायचं. टी२० क्रिकेटचा नवा स्टार सुर्यकुमार यादव याच्या अभ्यासक्रमात मात्र हे पुस्तक नसावं. फलंदाजीसाठी मैदानात उतरल्यानंतर चौफेर फटकेबाजी करतांना
तो नियमांच्या चौकटीत स्वतःला जोखडून ठेवत नाही. तो पिचवर येतो, पहिल्या बॉलपासून दिमाखात कर्तव्य बजवायला सुरूवात करतो आणि शेवटही तसाच करून सामन्यामध्ये भारतीय संघाला एका नव्या उंचीवर नेवून ठेवतो.

सूर्यकुमार त्याच्या या गुणांमुळे त्याची फलंदाजी भलेही एखाद्या वृत्तबध्द कवितेसारखी भासत नसेल पण ती साध्या साध्या रूपकांमधून समाजप्रबोधन करणाऱ्या भारूडासारखी नक्कीच वाटते. हे एक- एक रूपक म्हणजेच दुसरे तिसरे काहीही नसून क्रिकेटच्या पुस्तकातील नियमांच्या बाहेर जावून त्याने मारलेले फटके असल्याने हा पुस्तकाबाहेरचा सूर्य सध्या भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या मनावर सध्या राज्य करतोय. आयपीएलने भारतीय क्रिकेटला टी२० साठी दिलेली आत्तापर्यंतची सर्वात मोठी देणगी म्हणून सूर्यकुमारचा उल्लेख करावा लागेल.

परवा सुर्यकुमारने साखळीत झिम्बाब्वे विरूध्द पहिल्या डावात, शेवटच्या षटकात रिचर्ड नगारवा या गोलंदाजाची अक्षरशः पिसं काढली. ५ चेंडूत फटके खाल्यानंतर नगारवाने कंटाळून शेवटचा चेंडू ऑफ स्टम्पच्या बाहेर फुलटॉस टाकून बघितला. तो ज्या टप्यावर पडून पुढे वाईड ठरला असता त्या जागेजवळ सुर्याने डाव्या पायाचा तळवा नेवून ठेवला आणि उजव्या गुडघ्यावर वाकून आडव्या बॅटने तो चेंडू स्वतःच्या डाव्या खांद्यावरून प्रेक्षागारात फेकून दिला. या फटक्याचे हे वर्णन समजावून घेणे तुम्हाला जितके अवघड वाटले असेल, तितकाच तो फटका देखील अवघड होता. परंतु, हाच त्याचा नैसर्गिक खेळ आहे. टी२० क्रिकेटमध्ये चुका करायला वेळ नसतो. तिथे अल्पावधीत श्रीमंत कसे व्हायचे, याचा फंडा वापरावा लागतो. हा फंडा सुर्यकूमारला गवसलाय. २०२२ हे वर्ष आणि आयसीसीची नंबर वन रॅंकींगची खुर्ची त्यामुळेच या बहाद्दर फलंदाजाच्या नावावर आहे.

३२ वर्षीय सुर्यकूमारने त्याच्या क्रिकेटची सुरूवात रबरी चेंडूवर केली. या त्याच्या सुरूवातीच्या काळात सुर्यकूमारने असंख्य रबरी चेंडू अक्षरशः फोडले असतील. परंतु, आता मात्र तो आंतरराष्ट्रीय स्तरावराच्या गोलंदाजांना फोडणी देतोय. त्याची खेळी एकदा का रंगली की गोलंदाजांनाही बुचकळ्यात टाकणारे त्याचे फटके त्याचे काम सोपे करत असल्याचा अनुभव या विश्वचषकात भरपूर आलाय. संत एकनाथांचे एक अतिशय नावाजलेले भारूड आहे. त्या भारूडातल्या खाली दिलेल्या ओळी या आत्ताच्या सुर्यकूमारला तंतोतंत लागू पडतात.
सुर्य उगवला, प्रकाश पडला, आडवा डोंगर
आडवा डोंगर, तयाला माझा नमस्कार
या विश्वचषकात सुर्यकूमार तेजाने चमकतोय. जर तो असाच चमकत राहीला तर विश्वचषकाच्या वारीवर गेलेल्या भारतीय संघाचे नशिब देखील चमकेल यात शंका नाही.

Special Article on Indian Batsman Suryakumar Yadav by Jagdish Deore

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

येत्या १० नोव्हेंबरला प्रत्येक गावात होणार विशेष ग्रामसभा; हे आहे कारण…

Next Post

ऐतिहासिक! वडिलांनंतर पहिल्यांदाच मुलगा सरन्यायाधीश; न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी घेतली शपथ

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

महत्त्वाच्या बातम्या

केंद्राचे गिफ्ट! महाराष्ट्रात होणार हे दोन रेल्वेमार्ग

ऑक्टोबर 8, 2025
FB IMG 1755619676395 1024x634 1
महत्त्वाच्या बातम्या

असे आहे पॅकेज… शेतकऱ्यांना मिळणार एवढे पैसे, या सवलती… जाणून घ्या सविस्तर…

ऑक्टोबर 8, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
महत्त्वाच्या बातम्या

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले हे महत्वाचे निर्णय

ऑक्टोबर 8, 2025
Untitled 31
मुख्य बातमी

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी इतक्या हजार कोटींचे पॅकेज

ऑक्टोबर 8, 2025
AirAsia e1678528968685
महत्त्वाच्या बातम्या

दिवाळीच्या सणात विमान तिकीट दर वाढणार?

ऑक्टोबर 6, 2025
aadhar
महत्त्वाच्या बातम्या

लहान मुलांच्या आधार नोंदणीबाबत नवी घोषणा

ऑक्टोबर 6, 2025
DRI1JPGDBUG
महत्त्वाच्या बातम्या

“ऑपरेशन डिजीस्क्रॅप” अंतर्गत झाली ही मोठी कारवाई

ऑक्टोबर 6, 2025
M 1024x768 1
महत्त्वाच्या बातम्या

साखर कारखान्यांबाबत अमित शाह यांनी केली ही घोषणा

ऑक्टोबर 6, 2025
Next Post
FhGU74MaEAIJJvH scaled e1667974097541

ऐतिहासिक! वडिलांनंतर पहिल्यांदाच मुलगा सरन्यायाधीश; न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी घेतली शपथ

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011