इंडिया दर्पण विशेष लेख
पक्षी, फुलपाखरे, भुंगे आणि माश्यांचे अनोखे विश्व
पक्षी अन्न न चावता गिळून टाकतात, कसे? पक्षी स्थलांतर कसे करतात? त्यांना दिशाज्ञान असते का? फुलपाखराच्या कोषातून पूर्ण वाढीचे फुलपाखरू कसे जन्माला येते? त्यांच्या नवीन अवयवांची उत्पत्ती कशी होते? भुंग्यांना तापमानाचा काहीच कसा त्रास होत नाही? मधमाश्यांना फुलाचा मध मिळण्याच्या वेळेचे अचूक निदान कसे करता येते? हे प्रश्न तुम्हालाही पडलेत ना. तर, जाणून घेऊया या प्रश्नांची उत्तरे….
आज काल बराचसा युवा वर्ग तसेच मनाने युवा असणारे बुजुर्ग मंडळी निसर्गाच्या सान्निध्यात रममाण होताना दिसत आहेत. ही एक चांगली गोष्ट आहे. पण त्यात निसर्गाला देव किंवा शक्ती मानणारे लोक कमी आहेत. निसर्ग पर्यटन, अमली पदार्थांच्या पार्ट्या, गडकिल्ल्यावर जाऊन धुडगूस घालणे आणि सोशल मीडिया वर फोटो शेअर करणे ह्याचे प्रमाण खूप आहे. निसर्ग निरीक्षण किंवा अभ्यास ह्या बाबत बरेच जण उत्सुक राहत नाहीत. मग भले त्या क्षेत्रातील लोकांचा सुद्धा संयम कमी पडतो. निसर्ग बहुतांश वेळेस आपल्याला पूर्व सूचना देत असतो. प्राणीमात्रांना मात्र सहावे इंद्रिय विकसित झाले असावे. कारण निसर्ग प्रलय (Natural Calamities) होण्याअगोदर त्यात अडकणारे प्राणी मात्र काही काळापूर्वी तेथून गायब झालेले आढळतात. उदा. चेन्नई च्या सुनामी अगोदर हत्तींसारखे मोठे मोठे प्राणी पण समुद्रसपाटीपासून दूर गेलेले आढळले होते. समुद्रातील मासे पण त्या भागातून दूर गेले. दुसरे उदाहरण, ऑस्ट्रेलिया आणि ब्राझील येथे लागलेल्या प्रचंड जंगल आगीत प्राणीहानी कमी झालेली ज्ञात आहे.
असो. मुद्दा हा आहे की, निसर्गात जाऊन भौतिक गरजा एन्जॉय करण्यापेक्षा, थोडे अवांतर जाऊन खोलवर अभ्यास करून आपण काही गोष्टी, तंत्रज्ञान शिकलो, विकसित करू शकलो तर भावी पिढीसाठी आपण काहीतरी केल्याचे सार्थक लाभेल. ह्या पार्श्वभूमीवर आधारित आम्ही एक ‘वाइल्डर विंग्ज’ नावाचा ग्रुप बनवला आणि काही क्षेत्रातील माहिती गोळा करून ती संग्रहित करू लागलो. आम्ही निसर्गातील अशा काही प्रजाती निवडल्या की ज्यांना पंख आहेत आणि जे मुक्त आहेत. त्यामध्ये सुद्धा इंग्रजी B अक्षर पासून सुरू होणाऱ्या चार प्रजाती निवडल्या. Birds(पक्षी), Butterflies(फुलपाखरे), Beetles(भुंगे), Bees (माश्या) ह्यांचा अभ्यास करावयास सुरवात केली. आम्ही जीवशास्त्रीय दृष्ट्या अभ्यासास सुरवात केली. की जे उपलब्ध आहे, पण त्याच बरोबर ,विविध प्रजातींच्या विविध वैशिष्ट्यांचा (Properties, Typical behavior) पण अभ्यासास सुरवात केली.
या मध्ये खूप साऱ्या प्रश्नांनी आमची उत्सुकता वाढवली. पक्षी अन्न न चावता गिळून टाकतात, कसे? पक्षी स्थलांतर कसे करतात? त्यांना दिशाज्ञान असते का? फुलपाखराच्या कोषातून पूर्ण वाढीचे फुलपाखरू कसे जन्माला येते? त्यांच्या नवीन अवयवांची उत्पत्ती कशी होते? भुंग्यांना तापमानाचा काहीच कसा त्रास होत नाही? मधमाश्यांना फुलाचा मध मिळण्याच्या वेळेचे अचूक निदान कसे करता येते? त्या अचूक फुलांवर कशा आकृष्ट होतात? अश्या सारख्या अनेक प्रश्नांचे निरीक्षण करून त्यातून काही तंत्रज्ञान आपणास मिळते का हे बघणे हा आमच्या ग्रुपचे ध्येय ठरले.
या संबंधात काम करताना मी Biomimicry ह्या विषयाची माहिती करून घेतली. तसेच अमेरिकेतील Biomimicry इन्स्टिट्यूट येथे संलग्न झालो. त्यांचे टेक्निकल शीटस वापरू लागलो. त्यातून आम्ही काही प्रोजेक्ट्स हाती घेतले. वरील सर्व उपक्रमांचे,अभ्यासाचे,संशोधनाचे संकलन,आकलन संबंधित व्यक्तींशी शेअर करण्यासाठी आम्ही Wilderwings.in ही वेबसाईट प्रकाशित केली. ती आपण जरूर पहावी . खाली दिलेल्या लिंक वरून आपण ती वेबसाईट बघू शकता. या मध्ये आपणास रंगीत फोटोज् शिवाय काही व्हिडिओज, प्रोजेक्ट्स संबंधी माहिती तसेच ब्लॉग्जच्या माध्यमातून माहिती मिळत जाईल. तसेच पक्ष्यांवरील पुस्तक शॉप पण करता येईल. ज्या सर्वांना ह्या मध्ये स्वारस्य असेल त्यांनी ही वेबसाईट जरूर पहावी आणि शेअर करावी.तसेच यूट्यूब हॅण्डल वर जाऊन लाईक करून सबस्क्राईब करावे ही विनंती.
Special Article on Birds Butterflies Beetles Bees by Satish Gogate