नवी दिल्ली – स्पेनमधील कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेले निर्बंध संपताच नागरिकांनी रस्त्यावर उतरुन जल्लोष केला. त्यामुळे जगभराचे लक्ष त्याकडे वेधले गेले आहे. असून त्यानंतर काल मध्यरात्री देशातील उत्सव साजरा करण्यात आला. सरकारने मात्र कर्फ्यू संपला तरी कोरोना महामारी संपली नाही असे स्पष्ट केले आहे.
स्पेनमध्ये कोरोना निर्बंध हटताच नागरिकांनी जल्लोष केला. सध्या येथे नाईट कर्फ्यू देखील काढून घेण्यात आला आहे, उत्सव साजरा करण्यासाठी रात्री कोट्यवधी लोक बार्सिलोना आणि माद्रिदच्या रस्त्यावर उतरले. अनेक लोक मास्कविना दिसले आणि सामाजिक अंतर देखील पाळलेले दिसत नव्हते. लाखो लोक कोविड -१९ प्रतिबंधांचे उल्लंघन करीत होते. वास्तविक अद्याप तेथे 6 पेक्षा जास्त लोक एकत्रित येण्यास बंदी आहे.
बार्सिलोना किना-यावर गस्त घालत असलेल्या पोलिसांनी व्हॅनच्या लाउडस्पीकरवरून गर्दीला इशारा दिला की, सहापेक्षा जास्त लोकांच्या समूहात एकत्र येण्यास मनाई आहे, कृपया समुद्रकिनारा सोडून घरी जावे. किशोरवयीन मुले आणि तरुणांनी निर्बंध शिथिल केल्यावर समुद्रकिनारी गर्दी केली होती.
महापौर जोस लुईस मार्टिनेझ-आल्मेडा यांनी सांगितले की, माद्रिदमधील रस्त्यावर मद्यपान करण्यास परवानगी नाही. आपल्या प्रत्येकाने हे समजून घेणे आवश्यक आहे. आपण समाजात राहतो आणि कर्फ्यू संपवण्याचा अर्थ असा नाही की, कोरोना महामारी संपली आहे.