नाशिक – नाशिकचे जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांची राज्याच्या गुप्तवार्ता विभागात उपायुक्तपदी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी शहाजी उमाप हे नाशिकचे जिल्हा पोलिस अधीक्षक पदाचा पदभार स्विकारणार आहे. उमाप हे मुंबई शहराच्या व्हिआयपी सुरक्षा विभागात उपआयुक्तपदी होते. राज्यातील ३२ अधिका-यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यात नाशिकचा समावेश आहे. पाटील यांनी पदभार स्विकारल्यापासून अनेक धडकबाज कारवाया सुरु केल्या. त्यांनी जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा घालण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांची अचानक बदली केल्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.