नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी केले आवाहन
नाशिक – सध्या कोरोना लाट ही पावसाळ्यातल्या पुराच्या पाण्यासारखी फोफावतेय. त्यामुळे प्रत्येकाने मी कोरोना स्प्रेडर नाही तर स्टॉपर आहे हा एकच ध्येय मनाशी बाळगून काळजी घेण्याची गरज आहे. शासनाने कडक निर्बंध लागू केल्यावर बुधवार दिनांक १४ एप्रिल रात्री ८ वाजे पासून त्याची कडक अंमलबजावणी होत आहे.यामुळे संख्या आटोक्यात येण्यास मदत होईल. खरेतर गावागावात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. मालेगाव आणि निफाड यात आघाडीवर असताना इतर तालुक्यांमध्ये सुद्धा आकडे वाढताना दिसत आहे. हीच चेन ब्रेक करण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे आपण सर्वांनीच पुढाकार घेण्याची गरज आहे.सध्या तीच आपली प्राथमिकता असल्याचे आवाहन नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी केले आहे.