इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – चित्रपटसृष्टीत कोणताही नवीन अभिनेता आला की, तो ‘लाखो दिलों की धडकन’ बनतोच. त्यातून जर तो अविवाहित असेल तर मग तो मोस्ट एलिजिबल बॅचलर असतो. असाच काहीसा प्रकार सध्या तेलगू सुपरस्टार प्रभासच्या बाबतीत घडतो आहे. ‘बाहुबली’च्या यशानंतर तो सगळ्यांचा अत्यंत लाडका झाला आहे. त्यामुळेच त्याच्या प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीवर त्याच्या चाहत्यांचे अगदी काटेकोरपणे लक्ष असतं. काही दिवसांपूर्वी ‘आदिपुरुष’ चित्रपटामुळे तो पुन्हा चर्चेत आला. चित्रपटाला प्रेक्षकांचा विरोध असला तरी त्यांना त्यातील प्रभासचा लूक आवडला.
या चित्रपटात प्रभास रामाच्या तर अभिनेत्री क्रीती सनॉन सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. यामुळेच प्रभास गेले काही दिवस चर्चेत आहे. यानंतरच प्रभास आणि क्रीती हे दोघे रिलेशनशीपमध्ये असल्याचं वृत्त समोर आलं होतं. यावर दोघांनी काहीच स्पष्टीकरण दिलेलं नाही. पण, नुकतंच एका मुलाखतीत प्रभासने लग्न करण्याचं सुतोवाच केलं आहे. कोणाशी लग्नगाठ बांधणार हे जाणून घ्यायला तुम्ही उत्सुक असाल, पण प्रभासने लग्न कुणाशी करणार असल्याचं जाहीर नाही केलेलं तर कधी करणार असल्याचं उत्तर दिलं आहे.
प्रभास लवकरच नंदामुरी बालकृष्णाच्या टॉक शो ‘अनस्टॉपेबल २’ मध्ये दिसणार आहे. नुकताच या भागाचा प्रोमो प्रदर्शित झाला. यात प्रभास भरपूर धमाल करताना दिसतो. या कार्यक्रमात प्रभासला त्याच्या खासगी आयुष्यातील बरेच प्रश्न विचारण्यात आले आणि त्याने त्याची मोकळेपणे उत्तरं दिली. याच कार्यक्रमात प्रभास लग्न कधी करणार हा प्रश्न त्याला विचारण्यात आला. त्यावर प्रभासने हसत उत्तर दिलं की, “आधी सलमान खानला लग्न करू द्या, मग मी करेन.” प्रभासच्या या उत्तरावर सगळे मनमुराद हसले. प्रभास आणि क्रीती हे एकमेकांना डेट करत आहेत या अफवा बॉलिवूड अभिनेता वरुण धवनच्या एका वक्तव्यामुळे पसरल्या होत्या. त्यावर मात्र प्रभासने अद्याप स्पष्टीकरण दिलेलं नाही.
South Superstar Prabhas on Marriage
Tollywood Entertainment Interview Actor