इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – बॉलिवूड मधील अनेक अभिनेत्री तगडे मानधन घेतात, तसेच त्यांचे संपत्ती प्रचंड आहे, परंतु त्यापेक्षाही साऊथ फिल्म इंडस्ट्रीची ‘लेडी सुपरस्टार’ अभिनेत्री नयनतारा सध्या तिच्या कमाईमुळे खूप चर्चेत आली आहे. नयनतारा ही साऊथ सिनेसृष्टीतील टॉप आणि लोकप्रिय अभिनेत्री आहे. नुकताच अभिनेत्रीच्या कमाईचा आकडा समोर आला आहे. लग्न आणि हनिमून साजरा केल्यानंतर आता अभिनेत्री लवकरच तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे.
एका रिपोर्ट्सनुसार, नयनतारा जवळपास 165 कोटी रुपयांच्या संपत्तीची मालकीण आहे. ती प्रत्येक चित्रपटासाठी 6 ते 7 कोटी रुपये मानधन घेते. नव्या चित्रपटासाठी अभिनेत्रीने भरमसाठ फी आकारली आहे. यामुळे नयनतारा आता साऊथची सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री ठरली आहे. नयनतारा लवकरच तिच्या 75व्या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु करणार आहे. नीलेश कृष्णा यांच्या चित्रपटात नयनतारा झळकणार आहे. या चित्रपटासाठी अभिनेत्रीने सुमारे 10 कोटी रुपये इतकी फी आकारली आहे.
विशेष म्हणजे नयनतारा साऊथची पहिली अशी अभिनेत्री आहे, जिला एका चित्रपटासाठी 10 कोटींचे मानधन देण्यात आले आहे. 2022 हे वर्ष नयनतारासाठी खूप चांगले गेले. यावर्षी तिने विग्नेश शिवनसोबत लग्नगाठ बांधली असून, लवकरच ती शाहरुख खानसोबत वैयक्तिक जीवनात, तसेच व्यवसायात यशाची शिखरे गाठली आहेत. दोन दशकांपासून ती साऊथ सिनेमात काम करत आहे. ती लवकरच शाहरुख खानसोबत आगामी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
तिने आपल्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्रीने साऊथसह बॉलिवूडच्या बड्या स्टार्ससोबत काम केले आहे. नयनतारा केवळ चित्रपटांच्या माध्यमातून कमाई करत नाही. तर, अभिनेत्री देखील एक गुंतवणूकदार देखील आहे. ती राउडी पिक्चर्स प्रोडक्शन कंपनीची मालकही आहे, यात तिचा पती विग्नेश शिवन भागीदार आहे. नयनताराने चाय वाला, द लिप बाम आणि सौदी अरेबियातील तेल कंपनीतही गुंतवणूक केली आहे.
नयनताराकडे BMW X5 (किंमत 76 लाख) आणि Audi TT Roadster (60 लाख) सारख्या लक्झरी कार आहेत. याशिवाय तिचा केरळमधील तिरुवाला येथे एक आलिशान बंगला आणि कोची येथील प्रेस्टीज नेपच्यून कोर्टयार्ड येथे एक आलिशान फ्लॅट आहे. रिपोर्ट्सनुसार, नयनताराने 50 सेकंदांच्या टीव्ही जाहिरातीच्या शूटिंगसाठी 5 कोटी रुपये घेतले होते. या जाहिरातीचे शूटिंग दोन दिवस चालले.
https://twitter.com/NayantharaU/status/1546807315369562112?s=20&t=D5jVD0SRRepq3JrDu1EILw
नयनताराचे पती विग्नेश शिवनची एकूण संपत्ती सुमारे 50 कोटी आहे. दिग्दर्शक म्हणून तो प्रत्येक चित्रपटासाठी 1 ते 3 कोटी रुपये घेतो. विग्नेश दिग्दर्शकासोबतच एक गीतकार देखील आहे आणि एका गाण्यासाठी सुमारे 1 ते 3 लाख रुपये आकारतो. लग्नानंतर हे जोडपे खऱ्या अर्थाने देशातील पॉवर कपल्सपैकी एक बनले आहे. नयनतारा आणि विग्नेशची एकूण संपत्तीबद्दल संपत्ती 215 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.
दरम्यान, नयनतारा आणि विग्नेश लग्नाआधी 6 वर्षे एकमेकांना डेट करत होते. नयनतारा शाहरुख खानसोबत ‘जवान’ चित्रपटात काम करत आहे. हा चित्रपट 2023 मध्ये रिलीज होणार आहे. दुसरीकडे, विग्नेश लवकरच अजित कुमार स्टारर ‘एके 62’ हा चित्रपट दिग्दर्शित करणार आहे. लायका प्रॉडक्शनच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती होत आहे.
South Actress Nayantara Revenue Wealth Money