गुरूवार, ऑगस्ट 28, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

अभिनेता रजनीकांत विषयी तुम्हाला हे माहित आहे का… तो मूळचा आहे महाराष्ट्रातील या जिल्ह्यातला…. त्याचे आयुष्य आहे नाट्यमय घटनांनी भरलेले…

by Gautam Sancheti
ऑक्टोबर 25, 2023 | 9:42 pm
in इतर
0
Rajnikant

थलायवा रजनी..

… परिस्थिती अगदीच हातातून निसटून गेली आहे. माळरानात असलेल्या त्या खंडहर मध्ये चहूबाजूंनी गुंड हातामध्ये बंदुका घेऊन उभे आहेत.. असहाय हिरोईन हात बांधलेल्या अवस्थेत सुटकेसाठी कसाबसा प्रयत्न करीत आहे. तिची बुढी मां आणि मैत्रीण देखील शत्रूंच्या तावडीत सापडले आहे.  मेन व्हीलन आणि त्याचे चित्रविचित्र दिसणारे बगलबच्चे जोरजोरात हसत “अब क्या करेगा तेरा हीरो..” टाईप डायलॉग मारत आहे… प्रेक्षक मात्र सावरून बसलेले.. कसल्यातरी प्रतीक्षेत.. इतक्यात एक उघडी जीप कोणत्याही गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांताच्या पलीकडे जाऊन उंच हवेत उडते..   त्या मोटारीत तो असतो..
त्याच्यावर प्रचंड गोळीबार केला जातो…  एका हातात स्टिअरिंग आणि एका हातातल्या  पिस्तुलीनी तो अचूक काहींना टिपतो… अखेर खंडहरच्या भिंती पार करून ती मोटार थेट हिरोइनच्या जवळ पोहोचते..  तो एकटा.. आजूबाजूला शंभरपेक्षा अधिक शस्त्र सज्ज लोक.. जणू काही सैन्यच.. काहीही असले तरी त्याच्या पाठीमागे  मां का आशीर्वाद आणि समोरच्या असंख्य प्रेक्षकांची अतूट श्रद्धा असते… तो  गॉगल गरगर फिरवत डोक्यावर चढवतो.  खिशातून एक सिगरेट काढतो.. डाव्या हातावर ठेऊन तो उजव्या हाताने टाळी वाजवतो.. ती देखील हवेत उंच उडून इमाने इतबारे  त्याच्या ओठात अलगद शिरते. लॉंग शॉट मध्ये सगळे खलनायकी पात्र तोंडाचा आ वासून उभे असतानाच तो पँटच्या मागे असलेली पिस्तुल गरागरा फिरवत बाहेर काढतो..
पुढील पाच मिनिटांत.. प्रचंड धुमशचक्री होते..  आसपासचे सर्वच खलनायक आणि त्यांचे पित्ते यमसदनी धाडले गेलेले असतात….
        पडदा  सेवेंटी एमएम किंवा कितीही एमएम असो जेव्हा त्याची एन्ट्री होते.. तेव्हा तो लार्जर दॅन लाईफ असतो.  कोणत्याही पडद्यापेक्षा मोठे त्याचे अस्तित्व निर्माण होते.
  कधी बिल्ला, कधी अब्दुल, कधी  काला, कधी लींगा.. कधी चिट्टी तर कधी डायरेक्ट रोबो होतो.. मात्र  बहुतांशी प्रेक्षकांसाठी तो देव असतो.. कारण तो थलायवा दि ग्रेट रजनीकांत असतो. तमिळ शब्द थलायवा म्हणजे लीडर, बॉस असा त्याचा अर्थ होतो. या अभिनेत्याने वयाची सत्तरी ओलांडली आहे. आजचा फोकस खास या चतुरस्त्र अभिनेत्यावर..
स्वप्नील तोरणे
डॉ. स्वप्निल तोरणे
(लेखक जनसंवाद अभ्यासक आहेत)
      रजनीकांत यांचे सारे आयुष्यच एखाद्या खास दाक्षिणात्य चित्रपटाप्रमाणे नाट्यमय घटनानी भरलेले आहे.
जिजाबाई आणि रामोजीराव यांच्या चार मुलांतील सर्वात लहान मुलगा म्हणजे शिवाजीराव होय. 12 डिसेंबर 1950ला बेंगलुरूमध्ये शिवाजीराव यांचा जन्म झाला. हेच शिवाजीराव पुढे जाऊन रजनीकांत बनले. त्यांचे मूळ गांव पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील मावळे कडेपठार आहे असे सांगितले जाते. तसेच जेजुरीचा खंडेराय त्यांचे कुलदैवत असल्याचे मध्यंतरी रजनीकांत ह्यांनी   एका मुलाखतीत सांगितले होते.
रजनीकांत पाच वर्षांचे होते तेव्हा त्यांच्या आईचं निधन झालं. आईच्या निधनानंतर घर चालवणं कठीण होतं. रजनीकांत यांनी घर चालवण्यासाठी हमाली केली. अनेक ठिकाणी नोकरी केली. शिक्षण घेत असताना बस कंडक्टर म्हणून देखील त्यांनी नोकरी केली. रजनीकांत यांनी मद्रास फिल्म इन्स्टीट्यूटमधून अभिनयाचा डिप्लोमा केला. त्यांनी आपल्या अभिनयाची सुरुवात पौराणिक कन्नड नाटकांमधून केली. यात त्यांची दुर्योधनाची भूमिका सर्वाधिक गाजली. दिग्दर्शक के. बालाचंदर यांनी रजनीकांत यांना एका कन्नड नाटकात काम करताना पाहिले होते. नाटकानंतर बालाचंदर यांनी रजनीकांत यांना तमिळ शिकायला सांगितले. अभिनयाचं शिक्षण घेत असतानाच रजनीकांत यांनी तमिळ भाषा शिकली. बालाचंदर यांनी आपला शब्द पाळला आणि  ‘अपूर्वा रागनगाल’ हा त्यांचा पहिला तामिळ सिनेमा मध्ये भूमिका साकारली. यात कमल हसन आणि श्रीविद्या यांच्याही भूमिका होत्या.
रजनीकांत 1
सुरुवातीला नकारात्मक भूमिका केल्यानंतर रजनीकांत पहिल्यांदा नायक म्हणून समोर आले ते एस. पी. मुथुरमन यांच्या ‘भुवन ओरु केल्विकुरी’ या सिनेमातून! या सिनेमानंतर एस. पी. मुथुरमन आणि रजनीकांत यांची जोडी चांगलीच जमली. त्यानंतर दोघांनी एकत्र पंचवीस पेक्षा अधिक सिनेमे सुपरहिट केले. बिल्ला हा व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी ठरलेला त्यांचा पहिला सिनेमा.  अमिताभ बच्चन यांचा ‘डॉन’  याच सिनेमाचा रिमेक होता.
दक्षिणेत सुपरस्टार असलेले रजनी हिंदी चित्रपटात फारसे रमले नाही. टी रामा राव यांचा ‘अंधा कानून’ हा रजनीकांत यांचा पहिला हिंदी सिनेमा होता.
कुटुंबवत्सल असलेल्या रजनीकांत यांची पत्नी लता रंगाचारी या आहेत.  लता त्यांच्या कॉलेज मासिकासाठी रजनीकांत यांची मुलाखत घेण्यासाठी गेल्या होत्या. १९८१ मध्ये दोघांनी लग्न केलं. लताजी आता चेन्नईमध्ये ‘द आश्रम’ नावाची शाळा चालवता. त्यांना ऐश्वर्या आणि सौंदर्या या दोन मुली आहेत. ऐश्वर्याचा नवरा सध्याचा सुपरस्टार धनुष हा रजनीकांत यांच्या पावलावर पाऊल ठेवत पुढे येत आहे. तर सौंदर्याचे नुकतेच दुसरे लग्न उद्योगपती आणि अभिनेता विशिगण यांच्याशी नुकतेच झाले आहे.
          अतिशयोक्ती हा सुरुवातीच्या काही काळातील रजनीकांत यांच्या चित्रपटांचा आत्मा होता. मात्र त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा पुढे या अतिशयोक्ती देखील थीट्या पडत असत. वर्षानुवर्षां पासून संता बंता प्रमाणे पॉवर ऑफ रजनीकांतचे विनोद चालत आले आहेत ते याचमुळे.
रजनीकांतने एकदा ठरवलं की आपल्याकडचं किमान एक टक्का ज्ञान तरी जगाला द्यायचं..
त्यातूनच गुगलचा जन्म झाला.
एकदा एका शेतकऱ्याने शेतात बुजगावण म्हणून रजनीकांतचा फोटो लावला आणि काय आश्चर्य झाले सर्व पक्ष्यांनी धान्य न्यायचे सोडून मागील वर्षी नेलेले धान्य परत आणून दिले… असले असंख्य पीजे रजनीभाई यांच्यावर केले गेले आहे. जिवंतपणी सुपरमॅन स्टेटस मिळवणारा भारतीय चित्रपसृष्टीतील हा एकमेव अभिनेता आहे.
           ते कोणत्याही प्रकारची भूमिका अफलातून  करतात. अँक्शन, कॉमेडी अँड रोमान्सचा बादशाह रजनीभाईच आहे.
रजनीकांत १
        आजही देशातल्या कोणत्याही थिएटर मध्ये कोणताही जुना चित्रपट पुन्हा लावला तरी हाऊसफुल्ल होण्याची किमया फक्त रजनीकांतचा सिनेमाचं करू जाणे. त्यांचा नवा सिनेमा रिलीज होणे हा तर एक मोठ्ठा सोहळा असतो. चार मजली उंच इमारती एवढे कट आऊट.. त्यांच्या मुर्त्या, पोस्टरवर केले जाणारे दुग्ध अभिषेक.. प्रेक्षकांवर केली जाणारी पुष्पवृष्टी.  तिकीट बुकिंगसाठी लागणाऱ्या लांबच लांब रांगा.. पहाटे सहा ते नऊचा मॉर्निंग शो.. रिलीज च्या दिवशी  ऑफिसेसला दिली जाणारी सुट्टी.. शाळा कॉलेजेस मध्ये मास बंक.. हे सगळे सगळे त्यांच्या अफाट लोकप्रियतेचे प्रतीक आहे. रजनीकांत पडद्यावर जेवढ्या स्टाईल मध्ये वावरतात.. त्याच्या शंभर टक्के उलट प्रत्यक्ष आयुष्यात जगताना आपल्याला दिसतात..  आपल्यातल माणूसपण त्यांनी अगदी कारकिर्दीच्या सुरुवाती पासून आज सत्तरव्या वर्षांपर्यंत कसोशीने जपलं आहे.
सेटवरचा कामगार असो किंवा राजकारण, व्यापार, उद्योग यातील प्रतिष्ठित नागरिक सर्वांसमवेत अत्यंत विनयशील मैत्रीपूर्ण वागणूक देणाऱ्या या सुपरस्टारने कधीच त्याचे स्टारडमचे प्रदर्शन मांडले नाही.
रजनीकांत यांना दक्षिणेतील लोक अक्षरशः देव मानतात. त्यांनी आपल्या आयुष्यभर कायम सर्वसामान्य लोकांना मदत केली आहे. आपत्कालीन परिस्थितीत रजनीकांत यांच्याकडून  स्वयंस्फुर्तीने मदत केली जाते ती देखील कोणताही गाजावाजा न करता.
        वयाची चाळीशी येते तो पर्यंत कॉस्मोटोलोजी ऑपरेशन करून घेण्याचा आजचा जमाना.
 मेक अप उतरवल्या नंतर आपले  सुपरस्टार पद नीट बासनात गुंडाळून  बहुतांशी वेळा पारंपारीक पांढरा शर्ट आणि लुंगी  परिधान करणारे मात्र फक्त रजनी..   शेकडो कोटींची गुंतवणूक आपल्या चित्रपटांवर होत असताना आपला रंग, सुरकुत्या, टक्कल झाकण्याचा.. लपवण्याचा कोणताही प्रयत्न न करता आपल्या उत्तुंग अभिनय क्षमतेवर विश्वास ठेऊन काम करणारा हा थलायवा खरोखरच लार्जर ‌दॅन  लाईफ आहे..
लेखमाला e1607869782148
वरील विशेष लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://indiadarpanlive.com/?cat=22
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

या व्यक्तींना आज विशेष अनुभव येतील..जाणून घ्या, गुरुवार २६ ऑक्टोंबरचे राशिभविष्य

Next Post

इंडिया दर्पण – हास्य षटकार – फटाक्यांसाठी संप्या काकांची युक्ती

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

kapus
संमिश्र वार्ता

केंद्र सरकारने कापसावरील आयात शुल्क माफीला दिली या तारखेपर्यंत मुदतवाढ

ऑगस्ट 28, 2025
kanda onion
स्थानिक बातम्या

शेतकऱ्यांच्या कांद्याचे भाव पाडणे हे केंद्र सरकारचे नियोजनबद्ध षडयंत्र…कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचा आरोप

ऑगस्ट 28, 2025
Untitled 1
संमिश्र वार्ता

मुंबईत अभिनेता सलमान खान यांच्या घरचा गणेशोत्सव…बघा, व्हिडिओ

ऑगस्ट 28, 2025
manoj jarange 1
महत्त्वाच्या बातम्या

मनोज जरांगे पाटील मुंबईला येणार की परत माघारी जाणार? सरकारचे प्रयत्न सुरु

ऑगस्ट 28, 2025
GzWb8 LbwAAmwZi e1756344943344
महत्त्वाच्या बातम्या

बघा, शिवतीर्थावरील हा व्हिडिओ….राज ठाकरे उध्दव ठाकरे यांच्या सहकुटुंब भेटीचे चित्रीकरण

ऑगस्ट 28, 2025
modi 111
मुख्य बातमी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवत्सरीनिमित्त दिल्या शुभेच्छा…क्षमा, करुणा आणि नम्रतेचे केले आवाहन

ऑगस्ट 28, 2025
प्रातिनिधिक फोटो
राष्ट्रीय

या चार नवीन रेल्वे मार्गाला केंद्रीय मंत्रिमंडळाने दिली मान्यता…१२ हजार ३२८ कोटींचा अंदाजित खर्च

ऑगस्ट 28, 2025
Screenshot 20250828 063447 Collage Maker GridArt
महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्रातील या चार शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर…शिक्षक दिनानिमित्त दिल्लीत समारंभ

ऑगस्ट 28, 2025
Next Post
laugh2

इंडिया दर्पण - हास्य षटकार - फटाक्यांसाठी संप्या काकांची युक्ती

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011