मंगळवार, जून 24, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

चित्रपटगृहात पुन्हा एकदा “झुकेगा नही साला”; ‘पुष्पा २’साठी अल्लू अर्जुनने घेतले इतके कोटी

by India Darpan
सप्टेंबर 13, 2022 | 5:09 am
in मनोरंजन
0
pushpa

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – ‘पुष्पा’ या चित्रपटाने कोट्यवधी रुपयांचा गल्ला जमवला. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट तुफान चाललाच तर यातील ‘झुकेगा नाही साला’ हा डायलॉग भलताच लोकप्रिय झाला. चित्रपटातील गाणी सुद्धा सोशल मीडियावर चांगलीच गाजली. आता ‘पुष्पा 2’ सुद्धा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘पुष्पा 2’ या चित्रपटाचे शूटिंग देखील सुरू झाले आहे. या चित्रपटाच्या जितक्या चर्चा आहेत तेवढ्याच चर्चा आहेत चित्रपटातील नायक अल्लू अर्जुनच्या. अल्लू अर्जुनने या चित्रपटाच्या मानधनापोटी १२५ कोटी रुपये घेत सलमान खानशी बरोबरी केल्याचे समजते.

‘पुष्पा’नंतर प्रेक्षकांमध्ये ‘पुष्पा २’ची प्रचंड उत्सुकता आहे. सीक्वेलमध्येही अल्लू अर्जून आणि रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत असतील. पुष्पाच्या यशानंतर अल्लू अर्जुनने त्याच्या मानधनात वाढ केल्याचं समजतंय. ‘पुष्पा: राइज’ या चित्रपटानंतर स्टायलिश स्टार अल्लू अर्जुनची लोकप्रियता देशभरात प्रचंड वाढली. अल्लू अर्जुन हे नाव फक्त दक्षिणेतच नाही तर बॉलिवूडमध्येही चर्चेत आलं. आता या चित्रपटाचा दुसरा भाग ‘पुष्पा: द रुल’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच सीक्वेलच्या शूटिंगची सुरुवात झाली. या चित्रपटासाठी अल्लू अर्जुनने तगडं मानधन घेतल्याचं कळतंय. या मानधनावरून आता त्याची तुलना बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खानशी केली जातेय.

‘पुष्पा २’ चे बजेट ४५० कोटींचे असल्याचे सांगितले जात आहे. सीक्वेलमध्येही प्रेक्षकांना ॲक्शनचा जबरदस्त तडका पहायला मिळणार आहे. ‘पुष्पा: द राईज’ या चित्रपटाने जगभरात तब्बल ३०० कोटींचा गल्ला जमवला होता. या चित्रपटाची क्रेझ देशभरात पहायला मिळाली. यातील समंथा रुथ प्रभूचा ‘ऊ अंटावा’ हे गाणंसुद्धा तुफान गाजलं. सलमानने त्याच्या आगामी चित्रपटासाठी जवळपास १२५ कोटी रुपये मानधन घेतल्याची याआधी चर्चा होती. पुष्पाच्या सीक्वेलसोबतच प्रेक्षकांमध्ये सलमानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटाविषयीही प्रचंड उत्सुकता आहे. नुकताच सलमानचा या चित्रपटातील लूक सोशल मीडियावर शेअर करण्यात आला होता.

South Actor Allu Arjun Pushpa 2 Movie Fees
Entertainment

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

गुंतवले १५ हजार आता झाले तब्बल १ कोटी; कोणता आहे हा तुफान शेअर? घ्या जाणून…

Next Post

धक्कादायक! कोरोनामुळे वाढला या गंभीर आजाराचा धोका

India Darpan

Next Post
प्रातिनिधीक छायाचित्र

धक्कादायक! कोरोनामुळे वाढला या गंभीर आजाराचा धोका

ताज्या बातम्या

crime 88

धाडसी घरफोडीत चोरट्यांनी पावणे नऊ लाखाच्या ऐवजावर मारला डल्ला…अशोका मार्ग भागातील घटना

जून 24, 2025
fir111

बाली येथील सहलीचे आमिष दाखवत पैसे गोळा करून यात्रा कंपनीने ग्राहकांना घातला गंडा

जून 24, 2025
mantralya mudra

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले हे महत्त्वपूर्ण आठ निर्णय….

जून 24, 2025
CM

महानिर्मिती राज्यात उभारणार १०७१ मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प…मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जून 24, 2025
Rahul Gandhi

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मतदारसंघातील मतदानावरुन राहुल गांधी यांचा गंभीर आरोप….

जून 24, 2025
jail11

लग्नाचे आमिष दाखवून होंडा सिटी कार, बुलेट व २४ लाखांची रोकड उकळली, बापलेकास अटक…अशी केली फसवणूक

जून 24, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011