पुणे – आपल्या देशात मोबाईल तथा स्मार्टफोन वापरणाऱ्या ग्राहकांची संख्या प्रचंड प्रमाणावर वाढत आहे. त्याचप्रमाणे या सर्व स्मार्टफोन बरोबरच त्याच्या अन्य ॲक्सेसरीज म्हणजेच हेडफोन आणि अन्य सामुग्रीचा ही वापर वाढला आहे.
प्रचंड गर्दीत असो की कार्यालयीन कामाच्या ठिकाणी आजच्या काळात हेडफोन आवश्यक मानला जातो. तसेच प्रवासात तसेच कार ड्रायव्हिंग करताना या हेडफोनचा वापर करण्यात येतो. त्यामुळे हेडफोन आधिकाधिक अत्याधुनिक आणि उपयुक्त असावा, अशी प्रत्येकाची अपेक्षा असते. ही अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न काही कंपनी करत आहेत.
वैशिष्ट्य
साउंडकोर या कंपनीने भारतात लाईफ Q30 आणि लाईफ Q35 असे दोन नवीन हेडफोन लॉन्च केले आहेत. हे हेडफोन हायब्रीड अॅक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशन, फास्ट चार्जिंग आणि 60 तासांपर्यंत बॅटरी लाइफ यासारख्या उत्कृष्ट वैशिष्ट्यांसह येतात. Life Q30 ची किंमत 7,999 रुपये आणि Life Q35 ची किंमत 9,999 रुपये आहे. तसेच हे दोन्ही हेडफोन तुम्ही फ्लिपकार्टवरून खरेदी करू शकता. कंपनीने काळ्या रंगात Q30 हेडफोन आणि गुलाबी रंगाच्या पर्यायात Q35 लाँच केले आहेत.
पारदर्शकता मोड
मजबूत बास आणि ट्रेबलसाठी, हेडफोन्समध्ये 40 मिमी सिल्क डायफ्राम ड्रायव्हर्स आहेत. सदर हेडफोन ANC सपोर्टसह देण्यात येतात आणि बाहेरचा आवाज कमी करण्यासाठी चार मायक्रोफोन असतात. यामध्ये ट्रान्सपोर्ट, इनडोअर आणि आउटडोअर असे तीन वेगवेगळे मोड देण्यात आले आहेत. हेडफोन्समध्ये पारदर्शकता मोड देखील आहे, ज्याच्या मदतीने वापरकर्ते संगीत ऐकू शकतात तसेच बाहेरचा आवाज देखील ऐकू शकतात.
तिप्पट वेग
दोन्ही साउंडकोर हेडफोन हलके आहेत आणि मेमरी फोन इअरकप आणि हेडबँडसह येतात. याबाबत कंपनीचे म्हणणे आहे की, दोन्ही हेडफोन हाय-रेझ ऑडिओ आणि हाय-रेस ऑडिओ वायरलेस प्रमाणित आहेत. Life Q35 मध्ये, कंपनी Sony चे LDAC कोडेक ऑफर करत आहे. हा कोडेक मानक ब्लूटूथ कोडेकपेक्षा तिप्पट वेग देतो.
फास्ट चार्जिंग
या हेडफोन्समध्ये इक्वेलायझर सेटिंग्ज देखील देण्यात आल्या आहेत, ज्या साउंडकोर अॅपच्या मदतीने सेट केल्या जाऊ शकतात. बॅटरीबद्दल बोलायचे झाले तर, साउंडकोरचे हे दोन्ही हेडफोन ANC चालू असलेल्या 40 तासांपर्यंत आणि ANC शिवाय 60 तासांपर्यंत प्लेबॅक वेळ देतात. यामध्ये, कंपनी फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील देत आहे आणि ते 5 मिनिटांच्या चार्जिंगमध्ये 4 तासांपर्यंत प्लेबॅक देतात.