जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एखादी गोष्ट चुकीची घडली किंवा कुणाची माफी मागायची असेल तर ‘सॉरी ‘ हा शब्द प्रचलित आहे. त्यामुळे सामाजिक किंवा कौटुंबिक पातळीवर सॉरी शब्द सर्रासपणे वापरला जातो. त्याचप्रमाणे मित्रांमध्ये देखील नेहमी सॉरी शब्दाचा वापर होतो. परंतु राजकारणात एखादी गोष्ट कुणी चुकीची बोलली तर मी असे बोललोच नाही असे म्हटले जाते. परंतु खूपच हल्लाकल्लोळ उडाला किंवा दबाव वाढला तर माफी मागितली जाते, परंतु एका राजकीय कार्यकर्त्यांनी तथा नगरसेवकाने चक्क सार्वजनिक ठिकाणी फलक लावून ‘सॉरी ‘ असा उल्लेख केलेला आहे, त्याची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे.
जळगावमध्ये एका नगरसेवकाने लावलेले बॅनर सध्या चर्चेला कारण ठरत आहे. संबंधित नगरसेवकाने ‘सॉरी दादा’ अशा आशयाचे बॅनर लावून माजी आमदार सुरेश जैन यांची जाहीर माफी मागितली आहे. माजी आमदार सुरेश जैन हे राजकीय जीवनात सक्रिय असताना जळगाव महापालिकेचे नगरसेवक अनंत उर्फ बंटी जोशी हे त्यांचे कट्टर विरोधक होते. मात्र, घरकुल घोटाळ्याप्रकरणी नियमित जामीन मिळाल्यानंतर सुरेश जैन जळगावात आले. त्यानंतर त्यांच्याबाबत कट्टर विरोधी भूमिका घेणाऱ्या नगरसेवकाने त्यांची जाहीर माफी मागितली.
वास्तविक अनंत जोशी यांनी आपण सुरेश जैन यांची जाहीरपणे माफी का मागितली यामागचे कारण सांगितले आहे. बॅनर लावण्यामागचे कारण फक्त इतकेच आहे की, भारतीय जनता पार्टीत असताना किंवा मनसेचा नगरसेवक असताना मी तेव्हा सुरेश जैन आणि त्यांच्या खान्देश विकास आघाडीवर अनेकवेळा आरोप केले आहेत. अनेक आंदोलने केली आणि जाहीर टीका केली, असे अनंत जोशी यांनी सांगितले आहे. मात्र भर चौकात बॅनर माफीचे बॅनर लावून माफी मागितल्याने हा विषय केवळ शहरात नव्हे तर राज्यभरात चर्चेत आहे.
माजी आमदार सुरेश जैन हे मागील काळात राजकीय जीवनात सक्रिय असताना जळगाव महापालिकेमध्ये नगरसेवक अनंत जोशी हे सुरेश जैन यांचे कट्टर विरोधक होते. शहरातील विकास कामांबाबत टीका करण्याची एकही संधी बंटी जोशी सोडत नसत. परंतु आता खरेतर त्यांच्यासोबत खासगीत मला बोलता आले असते. त्यांचे माझ्यासोबत चांगले संबंध आहेत. त्यांचे माझ्यावर प्रेम आहे. मी त्यांना आता रोज भेटतोसुद्धा. परंतु मी त्यांच्यावर जाहीरपणे टीका केली होती. तर मला माफी सुद्धा जाहीरपणे मागायची होती, असे जोशी यांचे म्हणणे आहे.
Sorry Dada Banner Jalgaon Politics Viral What is this