मुंबई – कोरोना काळात गरजवंतांसाठी देवदूत म्हणून समोर आलेला बाॉलिवूड अभिनेता सोनू सूदच्या सहा मालमत्तांची प्राप्तीकर विभागाने पाहणी केली आहे. सोनू सूदच्या कार्यालयाचीही पाहणी केली जात असत्याचे वृत्त एनडीटीव्हीने दिले आहे. दिल्ली सरकारच्या मेंटरशिप कार्यक्रमाशी तो काही दिवसांपूर्वी जोडला गेला. त्यानंतर प्राप्तीकर विभागाने कारवाई केली आहे. सोनू सूद याने कोरोना काळात अनेक लोकांना आपल्या घरी पोहोचवलेच शिवाय त्यांना अन्नधान्य, औषधे. ऑक्सिजन सिलिंडर पुरविण्याचीही व्यवस्था केली होती. त्याच्या समाजकार्यामुळे सर्वस्तरातून त्याचे कौतुकही झाले आहे. सोनू सूद गेल्या काही दिवसांपासून राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या वृत्तावरून चर्चेत आहे. परंतु राजकारणात उतरणार नसल्याचे सोनूने यापूर्वीच स्पष्ट केले आहे.