नवी दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या सरकारी शाळांमधील मुलांसाठी ‘देश के मेंटर’ कार्यक्रमाचे ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून चित्रपट अभिनेता सोनू सूदच्या नावाची घोषणा केली. सोनू सूदचा या कार्यक्रमाशी संबंध निश्चितच मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी उपयुक्त ठरेल असेही केजरीवाल यांनी सांगितले. लॅाकडाऊन काळात सोनू सूदने केलेली मदतीचे केजरीवाल यांनी यावेळी कौतुक केले.
https://twitter.com/ArvindKejriwal/status/1431144987513606147?s=20