मुंबई – बॉलिवूडमध्ये खलनायकाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता सोनू सुदला एका चित्रपटात हिरो मारत असल्यामुळे एका ७ वर्षाच्या मुलाने त्याच्या घरातला टीव्हीच फोडून टाकला. या सात वर्षाच्या फॅनचा व्हिडिओ सोनू सुदने ट्विट करत शेअर केला आहे. यात टीव्ही फोडू नका, नाहीतर तुझे वडील दुसरा टीव्ही खरेदी करायला सांगतील असे म्हटले आहे. त्यावरही अनेक फॅनने प्रतिक्रिया दिल्या आहे.
कोरोना महामारीच्या काळात सोनू सुद स्थलांतरीत मजुरांच्या मदतीला धावून आला. त्यामुळे तो ख-या आयुष्यात नायक ठरला. त्यामुळे त्याचे फॅनही सर्वच वयोगटात वाढले. त्यामुळेच एका लहान मुलाने रागाच्या भरात त्याचाच टीव्ही फोडला.
खरं तर सोनू बॉलिवूडमध्ये खलनायकाची भूमिका साकारतो. पण, त्याने कोरोना काळात नायकाची भूमिका पार पाडली. त्याच्या मदतीमुळे अनेक स्थलांतरितांना त्यांच्या घरी सुखरूप पोहचले. तर त्याच्या मदतीमुळे अनेक बेरोजगारांना रोजगार मिळाला. देशाच्या वेगवेगळ्या भागात अडकलेल्या मजुरांना, प्रवाशांना सोनूने रेल्वे आणि बसच्या माध्यमातून त्यांच्या घरी सुखरूप पोहचवले. त्याचवेळी देशाबाहेर अडकलेल्या विद्यार्थांची भारतात येण्याची सोयही त्याने स्वःखर्चातून केली. या विद्यार्थ्यांना भारतात परतण्यासाठी त्याने थेट विमानांची सोय केली. खेडोपाड्यात राहणाऱ्या लोकांच्या राहण्याची सोयही त्याने केली. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत, इतर वैद्यकीय मदत सोनू सुदने दिल्या. त्याचबरोबर गरजू विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी शिष्यवृत्तीदेखील जाहीर केली. त्यामुळे सोनूला चित्रपटात मारणे सुध्दा त्याच्या फॅनला आवडत नसल्याचे समोर आले आहे. या लहान मुलाचा बघा हा व्हि़डिओ…..
https://twitter.com/SonuSood/status/1415121878931283968?s=20