इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
काँग्रेस नेत्या आणि राज्य सभा खासदार सोनिया गांधी यांना गुरुवारी गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची नियमित तपासणी करण्यात आली असून आता प्रकृती स्थिर आहे. आज त्यांना डिस्जार्ज मिळण्याची शक्यता आहे. गुरुवारी सकाळीच त्यांना रुग्णलायात दाखल करण्यात आले. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सोनिया गांधी ७८ वर्षाच्या झाल्या.
सोनिया गांधी यांना रुग्णालयात दाखल करताच चिंतेचे वातावरण परसले. त्यांना रुग्णालयात का दाखल करण्यात आले याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आरोग्याच्या समस्या भेडसावत असल्यामुळे त्यांना दाखल केल्याचे बोलले जाते. गेल्या आठवड्यात १३ फेब्रुवारी रोजी त्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन दरम्यान राज्यसभेत हजर होत्या. त्यावेळेस त्यांनी सरकारला जनगणना लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी केली होती.