इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या आई पाओला माइनो यांचे निधन झाले आहे. शनिवारी 27 ऑगस्ट रोजी त्यांचे इटलीमध्ये निधन झाले आणि मंगळवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सध्या सोनिया गांधीही परदेशात आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनीही सोनिया गांधी यांच्या आईच्या निधनाला दुजोरा दिला आहे. त्यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. सोनिया गांधी 24 ऑगस्ट रोजी उपचारासाठी देशाबाहेर गेल्या होत्या. त्यांच्यासोबत प्रियांका गांधी आणि राहुल गांधीही होते.
जयराम रमेश यांनी सांगितले की, सोनिया गांधी उपचारासाठी परदेशात गेल्या असून यावेळी राहुल गांधी आणि प्रियांका गांधीही त्यांच्यासोबत असतील. आपल्या आजारी आईची प्रकृती जाणून घेण्यासाठी त्या जाणार आहेत. त्यानंतरच त्या दिल्लीला परतणार असल्याचे रमेश यांनी सांगितले होते. याचा अर्थ सोनिया गांधी बहुधा आईच्या मृत्यूपूर्वी त्यांना भेटल्या होत्या आणि त्यांची प्रकृती जाणून घ्यायची होती. मात्र, आतापर्यंत सोनिया गांधी यांच्या आईचे निधन आणि त्यांच्या अंत्यसंस्काराबद्दल फारशी माहिती समोर आलेली नाही.
https://twitter.com/Jairam_Ramesh/status/1564938856549720066?s=20&t=Zm7B-uDV7sDUcPkOI-jbXg
Sonia Gandhi Mother Paola Maino Death