नवी दिल्ली – विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांची बैठक काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. डिजिटल स्वरुपात झालेल्या या ही बैठकीत काँग्रेससह १९ पक्षांचे नेते बैठकीला उपस्थित होते. यात काँग्रेस, टीएमसी, राष्ट्रवादी, द्रमुक. शिवसेना, जेएमएम, सीपीआय, सीपीएम, नेशनल कॉन्फ्रेंस, आरजेडी, एआययूडीएफ, वीसीके, लोकतांत्रिक जनता दल, जेडीएस, आरएलडी, आएसपी, केरल काँग्रेस मणी, पीडीपी आणि आययूएमएल या पक्षांचा समावेश होता. या अगोदरही अशी बैठक घेण्यात आली होती त्यावेळेस २२ पक्षाचे नेते हजर होते. आताच्या या बैठकीत काही पक्षांची अनुपस्थिती होती. या बैठकीत सोनीया गांधी यांनी सांगितले की, विरोधी पक्षांची एकजूट ही राष्ट्रीय हिताची मागणी आहे. काँग्रेस आपल्या बाजूने कोणतीही कसर सोडणार नाही. संसदेच्या येत्या अधिवेशनातही विरोधकांची एकता कायम राहील. पण, मोठी राजकीय लढाई संसदेबाहेर लढावी लागेल असे त्यांनी सांगितले.
केंद्र सरकारच्या विरोधात व्यापक विरोधी व्यूहरचनेसाठी या बैठकीचे आयोजन केले होते. गेल्या काही दिवसापासून महागाई, शेतक-यांचे आंदोलन, पेगॅसस, यासह अनेक मुद्दे विरोधी पक्षांनी एकत्र येऊन मोदी सरकारला संसदेत व बाहेर विरोध केला. आता पुढची रणनिती काय असावी याबाबत या बैठकीत चर्चा झाली. २०२४ साली लोकसभा निवडणूक व काही राज्यात होणा-या विधानसभा निवडणुकाबाबतही या बैठकीत चर्चा झाली. एकुणच या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. विरोधी पक्ष हा विखूरलेलाल असून त्याला एकाच छताखाली आणण्याचे काम या बैठकीमुळे झाल्याचे बोलले जात आहे.