नाशिक – सोनी मराठी वाहिनीवरील फ्रिमेन्टल इंडिया टेलिव्हिजन प्रॉडक्शन्स प्रा. लि. निर्मित ‘इंडियन आयडल मराठी’ या कार्यक्रमाने प्रेक्षकांच्या मनात घर केलंय. महाराष्ट्राला टॉप ५ स्पर्धक नुकतेच मिळाले आहेत. विजेतेपदासाठी सुरांची टक्कर बघायला मिळते आहे. परीक्षकांचे गुण आणि प्रेक्षकांची मतं यांच्या आधारे स्पर्धकांची विजेतेपदाकडे वाटचाल सुरूझाली आहे. जगदीश चव्हाण, प्रतिक सोळसे, सागर म्हात्रे, श्वेता दांडेकर आणि भाग्यश्री टिकले हे पाच स्पर्धक अंतिम फेरीत पोचले आहेत. दिंडोरी, नाशिकच्या प्रतिक सोळसेनी त्याच्या दमदार आवाजानी परीक्षकांची मनं जिंकली. प्रतिकची झिंगाट परफॉर्मन्सची हॅट-ट्रीक आत्ताच झाली होती आणि लोकसंगीत विशेष आठवड्यातही त्याला झिंगाट मिळाला आहे. ‘इंडियन आयडल मराठी’ च्या पहिल्या पर्वामध्ये सर्वाधिक झिंगाट मिळवून प्रतिकनी अभिमानास्पद कामगिरी केली आहे.
भाजी विक्रेता ते ‘इंडियन आयडल मराठी’ च्या टॉप ५ मध्ये स्थान मिळवणारा एक स्पर्धक, हा प्रतिकचा प्रवास कौतुकास्पद आहे. सुरांच्या मंचावर आलेल्या बहुतांश प्रमुख पाहुण्यांनी प्रतिकच्या गाण्यांचं कौतुक केलं आहे. गायक नंदेश उमप, गायक आनंद शिंदे यांनीही प्रतिकला आशीर्वाद दिले आहेत. आनंद शिंदे यांनी मंचावर येऊन ‘मी केवळ प्रतिकला भेटण्यासाठी आलो आहे’, असं जाहीरही केलं होतं. सुरुवातीपासूनच विविध धाटणीची गाणी सातत्यानं सादर करून प्रेक्षकांच्या आणि परीक्षकांच्या मनात स्वतःचं वेगळं स्थान प्रतिकनी निर्माण केलं आहे.
प्रतिकची दमदार गाणी ऐकण्यासाठी आणि अंतिम फेरीसाठीची त्याची तयारी बघण्यासाठी पाहा, फ्रिमेन्टल इंडिया टेलिव्हिजन प्रॉडक्शन्स प्रा. लि. निर्मित ‘इंडियन आयडल मराठी’, महाअंतिम सोहळा, १८ ते २० एप्रिल , सोम. ते बुध. रात्री ९ वाजता सोनी मराठी वाहिनीवर.