नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र प्रदेश ओबीसी सुवर्णकार समितीतर्फे राजयोग ममंगल कार्यालयांत द्वितीय वधू वर मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी राज्यभरातील सुवर्णकार समाजातील पालक व मुलं-मुली मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुवर्णकार समाजातील १८ पगड जातीं व पोट जातींचा रोटी बेटी व्यवहार व्हावा असा ठराव एक मुखाने संमत करण्यात आला. ठरावाला उपस्थित मान्यवर व संपूर्ण समाजातील प्रतिनिधी एकमताने मंजूरी दिली. अखिल भारतीय अध्यक्ष मंडळी यावेळी उपस्थित होते. आयोजक गजू घोडके यांची सर्वांनी हात उंचावून नेतेपदी निवड करण्यात आली.
विवाह इच्छूक मुलं-मुली मोठया प्रमाणात उपस्थित होते. सोनार समाजातील सर्व पोट जातींनी एकत्र रोटी बेटी व्यवहार करावा जेणेकरून आपला समाज वाढेल असे विचार भारतीय अध्यक्ष पुष्पा सोनार यांनी मांडले. मेळावा प्रमुख राजा कुलथे यांनी देखील आपले विचार मांडले. यावेळी काही पालकांना प्रवास भत्ता देण्यात आला. यावेळी मेळावा प्रमुख राजा कुलथे, संजय मंडलिक, अर्चना दिंडोरकर, धनराज विसपुते, पुष्पा सोनार, भास्करराव मैंद, सुरेश बागुल, राहुल जाधव, भास्करराव वडनेरे, रवी मैंद, वैशाली निकुंभ, रोहिणी जाधव, मीना सोनार, भालचंद्र घोडके, दिलीप देवरे, भूषण चोपडकर आदीसह सोनार समाजातील पालक, मुलं, मुली आदीं मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Sonar Society Roti Beti Vavhar Decision