मुंबई – निसर्ग व पर्यावरणाला प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती हानीकारक ठरते. त्यामुळे अनेक जण शाडू मातीच्या मुर्तीला पसंती देतात. पण, आता शेणापासून तयार केलेली मूर्ती तयार केली जात असून ही मूर्ती सुध्दा तितकीच आकर्षक व वजनाला हलकी आहे. विशेष म्हणजे पर्यावरणपूरक असल्यामुळे तिला चांगली मागणी सुध्दा आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेशाच्या मुर्तीची माहिती प्रसिद्दी चित्रपट अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. त्यात तिने सविस्तर पणे या मुर्तीबद्दल सांगितले आहे. बघा सोनालीचा हा व्हिडिओ…