इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सासू-सुनेचे भांडण ही गोष्ट घरोघरी घडते. तसेच जगाच्या सुरुवातीपासून ते जगाच्या अंतापर्यंत ती घटना चालणारी आहे, असे म्हटले जाते. कोणत्या कारणावरून सासू सुनेचे भांडण होईल हे सांगता येत नाही. यामध्ये सासू ही सुनेचा छळ करते, तसेच तिला मारहाण देखील करते. पण काही घरात सासूचा देखील छ्ळ होत असल्याचे निदर्शनास येते. असाच एक प्रकार बिहारमध्ये घडला. सासू सुनेचा भांडण झाले यामध्ये सुनेने चक्क सासूच्या अंगावरचे उकळते दूध फेकले.
आराहच्या टाऊन हद्दीतील अरण्यदेवी परिसरात झालेल्या वादातून सुनेने सासूवर गरम दूध फेकले. यामध्ये ती गंभीररित्या भाजली असून तिच्यावर सदर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सूर्या कुमारी देवी असे या जळालेल्या महिलेचे नाव असून, अरण्य देवी मोहल्ला येथील रहिवासी विनोद कुमार यांची ती पत्नी आहे.पती विनोद कुमारच्या म्हणण्यानुसार, त्यांची सून अनेकदा किरकोळ कारणावरून घरात भांडण करत असे आणि ती नेहमी तिच्या माहेरच्या घरी पळून जायची. एके दिवशी सकाळी त्यांच्या मुलाने काही गोष्टींमध्ये सहभाग घेण्याचा आणि वेगळे राहण्याचा निर्णय घेतला, तसेच वेगळा व्यवसाय करण्यास सुरुवात केली. यावरून दोघींमध्ये जोरदार वाद झाला. दरम्यान, सासू चहा बनवण्यासाठी स्वयंपाक घरात गेली होती. त्यानंतर सुनेने तिच्यावर गरम दूध फेकले. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून अधिक चौकशी सुरू आहे.